जालिंदर आल्हाट

अहिल्या नगर

राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनातर्फे तहसीलदार राहुरी यांना निवेदन देऊन पीडित शेतकऱ्यांना तत्काळ मदत पॅकेज  देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष अमोल शरद मोढे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील १६ गावांमध्ये मुसळधार पावसामुळे कापूस, तूर, मका, मुग, ज्वारी, ऊस, घास, तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे करण्यात आले असले तरी शेतकऱ्यांना अद्याप शासनाच्या वतीने मदत मिळालेली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.

या निवेदनात शासनाने तातडीने राहत निधी जाहीर करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच पंचनामे पारदर्शक पद्धतीने करावेत, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील ६०% शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झाले असल्याने शासनाने तात्काळ हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत निवेदनात नमूद केले आहे.

ही मागणी तहसीलदार साहेबांना लेखी स्वरूपात देण्यात आली असून, त्याची प्रत जिल्हाधिकारी व पालकमंत्री अहमदनगर यांनाही पाठवण्यात आली आहे. निवेदनावर अनेक शेतकरी प्रतिनिधी व स्थानिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed