शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी )

इंदापूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तसेच अनेक वर्षे वृत्तपत्र विक्रेते म्हणून कार्यरत असलेले सुरेश अनंतराव जकाते यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 56 वर्षाचे होते.त्यांच्या निधनाने इंदापूर तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रासह सर्व समाजघटकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
    सुरेश जकाते यांनी तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता आणि वृत्तपत्र विक्री या दोन्ही क्षेत्रांत सातत्यपूर्ण कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी विविध प्रमुख वृत्तपत्रांसाठी बातमीदार म्हणून जबाबदारी पार पाडली.त्यांच्या साधेपणामुळे, कामातील निष्ठेमुळे आणि बातमी संकलनातील अचूकतेमुळे ते नेहमीच सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते.
     त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जावई व नात असा परिवार आहे.
सुरेश जकाते यांच्या निधनामुळे इंदापूर तालुक्यातील पत्रकारितेतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना पत्रकार बांधवांनी व्यक्त केली आहे.तसेच विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी जकाते यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed