काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ताकदीने लढवणार — माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे प्रतिपादन

गुलाब शेख
उपसंपादक

मुखेड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी जाहीर केले की, काँग्रेस पक्ष मित्रपक्ष, वंचित बहुजन आघाडी तसेच समविचारी संघटनांना सोबत घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहे.

मोंढ्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित या बैठकीत शहर काँग्रेस कमिटी तर्फे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारी, वोट चोर स्वाक्षरी मोहीम आणि पदवीधर मतदार नोंदणी या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ वोट चोरीविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

बैठकीचे अध्यक्षस्थान माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी भूषविले. या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस डॉ. श्रावण रॅपनवाड, ज्येष्ठ नेते शिवलिंगराव पाटील कामजळगेकर, तालुकाध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर, कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर, शहराध्यक्ष हनुमंत नारनाळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक तयारीविषयी आपली मते मांडली. यानंतर मार्गदर्शन करताना हणमंतराव पाटील म्हणाले की, “आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्य देत काँग्रेस पक्ष न्याय देईल. मनुवादी विचारसरणीच्या भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पुढे यावे. तसेच वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडीबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरु असून लवकरच सकारात्मक निकाल लागेल.”

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतही माजी आमदार पाटील बेटमोगरेकर यांनी काँग्रेसची भूमिकेचे स्पष्टीकरण देत सांगितले की, “सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस सदैव वचनबद्ध आहे. सत्ता मिळविण्यासाठी नव्हे, तर लोकहितासाठी ही निवडणूक काँग्रेस लढवणार आहे.”

या बैठकीस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर, जि.प. माजी सदस्य प्रकाश उलगुलवाड, दत्तात्रय चौधरी, शिवाजी गायकवाड, बाळासाहेब पुंडे, हौगीराव पाटील नंदगावकर, वैजनाथ तिपणे, मारोती पाटील मटके, बालाजी वारे, जयप्रकाश कानगुले, रामेश्वर पाटील इंगोले, बालाजी साबणे, अखिल येवतीकर, केतन मामडे, विशाल गायकवाड, बालाजी वाडेकर, प्रकाश निमलवाड, माधव हुरजळ, राजु पाटील नागरजांब, इरफान मोमीन, आसद बल्की, संजय पिल्लेवाड, विठ्ठल पंदीलवाड तसेच शहर आणि ग्रामीण भागातील अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

You missed