चांगदेव काळेल (सातारा जिल्हा संपादक )

   खोलवडी  :  ( ता.वाई )“चंदन–वंदन गडाखाली घमशान! खोलवडीत बिबट्याची धम्माल हजेरी गावात दहशत, वनविभागाचा कडक इशारा!”

चंदन–वंदन गडाच्या पायथ्याशी असलेल्या खोलवडी गावात अलीकडे बिबट्याची जोरदार वर्दळ सुरू झाली असून गावकऱ्यांच्या छातीत धडधड वाढली आहे. काही नागरिकांना बिबट्या दिसताच त्यांनी लगेच वनविभागाला कळवले, आणि वनपरिक्षेत्र वाई–बेलमाचीची टीम एकदम तात्काळ धावत घटनास्थळी पोहोचली.
वनविभागाने गावकऱ्यांना आणि गडावर जाणाऱ्या पर्यटकांना ठणकावून सांगितलंयबिबट्या दिसला तर सेल्फी नको… सरळ आम्हाला फोन करा बिबट्याच्या अचानक वाढलेल्या हालचालींमुळे खोलवडी आणि आजूबाजूच्या गावात वनविभागाने जनजागृती केली.रात्री उशिरा बाहेर न पडणे, जनावरे सुरक्षित बांधणे, एकटे न फिरणे अशा अगदी सरळ आणि उपयोगी सूचना देण्यात आल्या.
गडावर फेऱ्या मारणाऱ्यांसाठी खास सूचना गडावर जाताना डोळे चार ठेवा; संशयास्पद हालचाल दिसली तर लगेच कळवाआता खोलवडीत बिबट्याचा वावर वाढल्याने गावकऱ्यांमध्ये सतर्कता वाढली आहे आणि वनविभाग परिस्थितीवर टप्प्याटप्प्याने लक्ष ठेऊन आहे.
बिबट्याचं सावट पसरलंय… पण गावकरी आणि वनविभाग दोन्ही बाजूने तयार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed