शिवाजी पवार  ( पुणे जिल्हा प्रतिनिधी )

शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने सन 2025-26 च्या चालु असलेल्या 25 व्या ऊस गळीत हंगामामध्ये एका दिवसात गाळपाच्या कारखान्याच्या इतिहासामध्ये मंगळवारी (दि. 2) 6400 मे. टन ऊसाचे गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. चालु गळीत हंगामामध्ये सुमारे 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेच्या दृष्टीने कारखान्याची नियोजनबद्ध वाटचाल सुरु आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी दिली.
        कारखान्याचा चालु गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असून, कारखान्याने मंगळवार अखेर 1,89,582 मे. टन ऊसाचे गाळप करीत 140360 क्विं. साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा आजचा साखर उतारा 10.60 टक्के असून, सरासरी साखर उतारा 9.95 टक्के एवढा आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन 3500 मे. टन असून सध्या सरासरी 5600 ते 5900 मे. टन क्षमतेने ऊस गाळप सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
     तसेच कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आज अखेर 7010411 युनिट वीज एक्स्पोर्ट करण्यात आली आहे. तर इथेनॉलचे आजअखेर 1640110 लि. उत्पादन निघाले आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचे बायोगॅस, सेंद्रिय खत आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने सुरु आहेत, असे सौ.भाग्यश्री पाटील यांनी नमूद केले. कारखान्याने एका दिवसामध्ये उच्चांकी 6400 मे. टन ऊस गाळप करून कौतुकास्पद कामगिरी केलेबद्दल कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस पुरवठा करणारे शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी तसेच कारखान्याचे हितचिंतक या सर्वांचे अभिनंदन केले आहे.
    यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed