नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )

पाटस : भारतीय संविधान दिन (बुधवार, दि. २६ नोव्हेंबर) उत्साहात व ऐतिहासिक वारशाचा अभिमान जागवत पाटस गावात साजरा करण्यात आला. संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी पाटस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दिवसभर विविध उपक्रम पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात…

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले.

सर्व उपस्थित नागरिकांनी राष्ट्रगीतानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून प्रजासत्ताक मूल्यांचा पुनःश्च संकल्प केला.

आनंदोत्सव आणि फटाक्यांची आतषबाजी

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना मिठाई वाटप करण्यात आले तसेच संविधान दिन साजरा करण्याच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित नागरिकांच्या “समता, न्याय आणि बंधुता”च्या घोषणा परिसरात घुमल्या.


मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

या संविधान दिन कार्यक्रमात पाटस गावचे विद्यमान सरपंच सौ. इंदुमतीताई शितोळे, उपसरपंच विकास कोळपे, तसेच सदस्य स्वप्नील सर भागवत, राजेश सोनवणे, छगनराव म्हस्के, गणेश चव्हाण, बायडाताई ठोंबरे, तृप्तीताई भंडलकर, आशाताई पानसरे, तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याचबरोबर माजी सरपंच योगेंद्र बाबा शितोळे, डॉ. मधुकर आव्हाड, शिवाजी बाप्पू ढमाले, जयंत दादा शितोळे, रमेश नाना जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे दत्तात्रय कोकाटे, तसेच पत्रकार, पाटस पोलिस स्टेशनचे फणसे साहेब, सामाजिक संघटना आणि युवक मंडळीं चाही उत्स्फूर्त सहभाग होता.


कार्यक्रमाचे आयोजन तक्षशिला बुद्ध विहार राहुल युवक मंडळातर्फे

कार्यक्रमाचे भव्य आयोजन तक्षशिला बुद्ध विहार राहुल युवक मंडळ यांनी केले. या उपक्रमासाठी मंडळातील ज्येष्ठ सभासद रोहिदास पानसरे, गौतम पानसरे, मिलिंद पानसरे, सुधीर पानसरे, विजय पानसरे यांचे विशेष योगदान राहिले.

युवकांमधून श्रेयस पानसरे, सूरज पानसरे, शिवधन पानसरे, तेजस पानसरे, भूषण पानसरे, सुजित पानसरे, सुयश पानसरे, धनंजय पानसरे आदींनी गावातील नागरिकांना आवाहन करून कार्यक्रम यशस्वी केला.

कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन मयूर पानसरे यांनी केले.


एकात्मतेचा अनोखा संदेश

कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूलभूत मूल्यांचा प्रभावी संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचला. सर्व समाजघटक एकत्रितपणे एकच ध्येय – संविधान गौरव — या भावनेने सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


अशा उत्साही, सुव्यवस्थित आणि संस्कारमय वातावरणात पाटस गावात संविधान दिन अभिमानाने साजरा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed