चांगदेव काळेल
मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पिलानी वाडी येथे ब्रांच पोस्ट ऑफिस चे उद्घाटन करण्यात आले..
नव्या ब्रांच पोस्ट ऑफिसची निर्मिती झाल्याने एक चांगली सुविधा लोकांसाठी उपलब्ध झाल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी पोस्ट ऑफिस सातारा डिव्हिजनचे सिनियर सुप्रिटेंडेट रत्नाकर एम टोपारे,डेप्युटी सुप्रिटेंडेट मयुरेश एम. कोले,असिस्टंट सुप्रिटेंडेट संदीप घोडके, बाजार समितीचे मा.सभापती विक्रम पवार, पंचायत समिती मा. उपसभापती अरविंद चव्हाण,राजू यादव, सुरेंद्र देशपांडे विकास सेवा. सोसा. पिलानी चेअरमन संपतराव साळुंखे विजयसिंह गावडे,विजयसिंह पोतेकर,अशोक कदम,दिलीप यादव, पिलानीवाडीचे युवा नेते शिव संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू साळुंखे,विजय कदम,
सरपंच निलम साळुंखे,उपसरपंच संजय साळुंखे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि संपूर्ण शेंद्रे जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकारी सरपंच,उपसरपंच,सदस्य आदीसह इतर उपस्थित होते.याच दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पिलानीवाडी येथे अंतर्गत रस्त्याचे व जिल्हा परिषद शाळेच्या रूमचे भूमिपूजन करण्यात आले.
