रणजित दुपारगोडे ( महाराष्ट्र प्रतिनिधी )
पुणे शहरात अल्पसंख्यांक समाजाची लोकसंख्या तब्बल सात ते आठ लाखांच्या घरात असतानाही, शिवसेनेच्या वतीने अल्पसंख्यांक समाजाला योग्य न्याय व प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
हे निवेदन पुणे शहर शिवसेना भवन येथे शिवसेना सचिव मा. संदीप शिंदे यांच्याकडे देण्यात आले. पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्यांक समाज वास्तव्यास असतानाही त्यांना संघटनात्मक पातळीवर डावलले जात असल्याची भावना या निवेदनातून मांडण्यात आली आहे.
या निवेदनामध्ये मा. एकनाथ साहेब शिंदे (उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते), मा. श्रीकांत साहेब शिंदे (लोकसभा खासदार), नीलम ताई गोरे (महाराष्ट्र राज्य उपसभापती), संजय मोरे साहेब (राज्य सचिव), रवींद्र भाऊ धंगेकर (महानगर प्रमुख), नाना भानगिरे (पुणे शहर शिवसेनाप्रमुख), अजय बापू भोसले (पुणे शहर संपर्कप्रमुख) यांच्यासह पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना पुणे शहरातील अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, शिवसेनेचे अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष शहीद खान साहेब व अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष समीर काजी यांच्या वतीने पुणे शहरातील अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे प्रदेश सहसचिव अजीम भाई शेख, शहर कार्यप्रमुख आसिफ भाई खान तसेच अल्पसंख्यांक विभागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे शहरातील अल्पसंख्यांक समाज शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा असून, पक्षानेही त्याच ताकदीने अल्पसंख्यांकांच्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पुणे शहरात अल्पसंख्यांक समाजाला न्याय, योग्य प्रतिनिधित्व व संघटनात्मक सहभाग मिळावा, यासाठी ही नम्र पण ठाम मागणी करण्यात आली असून, शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्व यावर सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
