गणेश कांबळे  ( उपसंपादक )

फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांनी वर्चस्व सिद्ध करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार संतोष फकीरा सरोदे यांनी तब्बल 20,908 मतांची आघाडी घेत घवघवीत विजय संपादन केला आहे.

या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर चुरस पाहायला मिळाली असली तरी मतदारांनी विकासाला, नेतृत्वाला आणि विश्वासाला कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण 32 पैकी 19 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने दणदणीत विजय मिळवत नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

विशेष म्हणजे गंगानगर व भेकराई नगर मधून नगरसेवक  पदाचे उमेदवार  सचिन नंदकुमार हरपळे , स्नेहा सचिन हरपळे , उषाताई कैलास बापू ढोरे  , श्री गिरीश बाप्पू ढोरे हे सर्व उमेदवार  प्रभाग क्रमांक 1, 2, 3 व 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण पॅनल भरघोस मतांनी निवडून आले, ही बाब पक्षासाठी मोठी यशस्वी ठरली आहे.

या विजयामागे पॅनल प्रमुख गणेश आबा ढोरे, प्रवीण तात्या कामठे, शंकर नाना हरपळे, सुहास आबा खुटवड या दिग्गज नेत्यांचे सक्षम नेतृत्व, प्रभावी नियोजन आणि कार्यकर्त्यांची एकजूट कारणीभूत ठरली.

यशानंतर बोलताना नवनिर्वाचित नगरसेवक गणेश आबा ढोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले,
“जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, तो आम्ही नक्कीच सार्थ करून दाखवू. विकास, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत नगरपरिषद चालवली जाईल.”

या ऐतिहासिक विजयामुळे फुरसुंगी–उरुळी देवाची राजकीय समीकरणे बदलली असून, आगामी काळात विकासाभिमुख आणि स्थिर कारभाराला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *