फिरोज सय्यद
सारखणी : नांदेड
संतप्त बंजारा समाज बांधवांनी संजय राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन केला निषेध
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे,
या मागणीसाठी सारखणी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाकडे राज्याचे
माजी मंत्री संजय राठोड यांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त बंजारा समाजाने तीव्र निषेध नोंदविला
आहे. समाजाच्या वतीने राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून संताप व्यक्त करण्यात आला.
सारखणी येथील महानायक वसंतराव नाईक चौकात मागील सहा दिवसांपासून बंजारा समाजाचे संघर्षयोद्धा अॅड. प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण हे आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र शासन आणि प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली न गेल्याने समाजात तीव्र नाराजी आहे. दरम्यान, रविवार २ नोव्हेंबर रोजी संजय राठोड हे त्यांच्या
खाजगी दौऱ्यात किनबट तालुक्यातील परसराम नाईक तांडा (सासरवाडी) येथे आले होते. या मार्गावरच उपोषण
सुरू असलेल्या सारखणी गावातून त्यांचा ताफा गेला. मात्र, त्यांनी उपोषण स्थळी न थांबता सरळ पुढे गेल्याने संतप्त बंजारा समाजाने ना. संजय राठोड यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून रोष व्यक्त केला. या वेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत
मंत्री राठोड यांच्याकडून झालेल्या दुर्लक्षाचा निषेध नोंदविला.
