नेताजी खराडे (दौंड तालुका प्रतिनिधी)

बारामती | १ डिसेंबर २०२५

स्वराज्य शक्ती सेना पक्षात बारामती तालुक्यात नवीन नेतृत्वाची निवड करण्यात आली असून, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. करुणाताई धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार राहुल जगन्नाथ भापकर यांची बारामती तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आज दि. १ डिसेंबर २०२५ रोजी त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

पक्ष संघटन वाढ, कार्यकर्त्यांचे बळकटीकरण आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज उभारण्यासाठी राहुल भापकर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुल जगन्नाथ भापकर म्हणाले की,
“पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी नक्की सार्थक ठरवेन. बारामती तालुक्यात पक्षाचे संघटन मजबूत करून लोकांपर्यंत पक्षाचा आवाज आणि विचार पोहोचवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षा सौ. करुणाताई मुंडे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”

या निवडीमुळे बारामती तालुक्यात स्वराज्य शक्ती सेना पक्षाचे कार्य अधिक वेगाने आणि संघटित पद्धतीने सुरू होणार असल्याचे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आगामी काळात या नेतृत्वामुळे स्थानिक राजकारणात नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed