श्याम शिंदे ( महागाव प्रतिनिधी )
बुधवार | 26 नोव्हेंबर | सकाळी 7 वाजता
महागाव फुलसंगी रोडवर आज सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात झाला असून या अपघातात पिकअप वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वालतुरकडून पुसदच्या दिशेने जाणारी वालूर-पुसद बस (क्र. MH 40 Y 5019) आणि विरुद्ध दिशेने येणारी पिकअप गाडी (क्र. MH 29 BE 4615) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात पिकअप चालक सुभाष देवकर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बसमधील विद्यार्थी व प्रवासी जखमी
या बसमध्ये शालेय विद्यार्थी आणि इतर प्रवासी असल्याची माहिती मिळाली असून त्यापैकी अनेकांना जखमा झाल्या आहेत. सर्व जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
वाहक व चालकांची माहिती अद्याप अस्पष्ट
बसचे चालक आणि वाहक यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलीस घटनास्थळी
अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनांचा चुराडा झाल्याने काही काळ रस्ता वाहतूक विस्कळीत झाली होती.
अद्याप जखमींची अचूक संख्या व स्थितीबाबत तपास सुरू आहे.
पुढील अपडेट लवकरच…
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
शोध सत्याचा, त्याला वास्तवाची धार…

