गुलाब शेख ( उपसंपादक )
४१ केंद्राध्यक्ष व १२३ मतदान अधिकारी उपस्थित; १५ जण गैरहजर**
मुखेड : आगामी मुखेड नगर परिषद सर्वसाधारण निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मतदान अधिकाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण बुधवारी (दि. १९ नोव्हेंबर) तहसील कार्यालय, मुखेड येथे घेण्यात आले. या प्रशिक्षणात ४१ केंद्राध्यक्ष तर १२३ मतदान अधिकारी (१, २ व ३) उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव, तहसीलदार एस. डी. कुशूमकर यांनी मतदान प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन केले. वीव्हीपॅट, ईव्हीएम मशीनचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक श्री. शांतलाल खोचरे यांनी दिले. मतदान केंद्रावर आचरण करावयाच्या नियमांचे काटेकोर पालन, मतदार पडताळणी, सीलिंग प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणी, निवडणूक दिवशीची कर्तव्ये आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, केंद्राध्यक्ष १५ जण व मतदान अधिकारी ११ जण प्रथम प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना गैरहजेरी संदर्भात कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
प्रशिक्षण नियोजनात राजेश जाधव, शांतता खरपे, शांतलाल जोशरे, ललित धळे, नरेश रोशनकर, ए. एस. मीराळ, एस. डी. कुशूमकर यांसह निवडणूक शाखेच्या विविध कर्मचारी अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
— राजेश जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार कार्यालय मुखेड
