नेताजी खराडे (दौंड तालुका प्रतिनिधी)
पाटस येथे करणीचा प्रकार
पाटस : महाराष्ट्र पोलीस न्युज 24
पाटस (ता. दौंड) येथे अंधश्रद्धा व करणीसदृश अघोरी प्रकार घडला आहे. पंचशीलनगर परिसरात भावकीची नावे लिहिलेल्या चिठ्ठीवर हळद-कुंकू लावून, लिंबूला लवंग व टाचण्या टोचून हा उतारा रस्त्यालगत टाकला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, संबंधितावर कारवाईची मागणी होत आहे.
पंचशीलनगर येथील जुन्या दौंड रोडलगत रविवारी (दि. ३०) सकाळी हे सर्व साहित्य आढळून आले. वहीच्या पानावर पवार कुटुंबातील २९ जणांची पूर्ण नावे लिहिली आहेत. त्यात महिलांसह लहान मुलांच्या नावांचाही समावेश आहे. त्यावर हळद-कुंकू टाकून त्याशेजारी लिंबू होते. त्या लिंबूला लवंग व टाचण्या टोचून त्यालाही हळद-कुंकू लावले होते. हा प्रकार दिसताच परिसरातील महिला व ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यांनी या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली. या अघोरी प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिठ्ठी व
भावकीच्या नावे चिठ्ठी, लिंबाला टोचली लवंग, टाचणी
परिसरात खळबळ
लिंबू जप्त केले आहे. त्यावेळी पवार कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे वापरून जाणीवपूर्वक हा अघोरी प्रकार करण्यात आला आहे. हा प्रकार कोणत्या उद्देशाने केला, याची सखोल चौकशी करावी. तसेच संबंधितांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थ संजय पवार यांनी केली. आता पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत दौंड तालुक्यात भोंदू महाराज, स्वयंघोषित बाबा, देवरुषी यांचे प्रस्थ वाढले आहे. त्यांच्याकडून दैवी चमत्कारांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा अंधश्रद्धा व भानामतीच्या कृत्यांना ग्रामीण भागातील अशिक्षितांसह काही उच्चशिक्षित लोकही बळी पडत

