जालिंदर आल्हाट
राहुरी तालुक्यातील फॅक्टरी प्रसादनगर, परिसर, चिंचवेहिरे व सूर्यनगर, रामनगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक जनावरे तसेच नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मागील दोन दिवसांपासून हा कुत्रा या परिसरात फिरत असून त्याने बकऱ्या, कोंबड्या, गाई तसेच काही नागरिकांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.
यासंदर्भात नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायत व नगरपालिका पशुवैद्यकीय विभागाला तातडीने माहिती घेऊन, पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून उपचार करावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान, देवळाली नगरपालिका व पशुसंवर्धन विभागाने या प्रकरणी तत्काळ पथक पाठवून कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
