शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी )
इंदापूर तालुक्यातील ( पुणे ) वडापुरी-माळवाडी हा जिल्हा परिषद गट सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. येथून विविध पक्षांकडून इच्छुकांची नावं पुढे येत असताना, काँग्रेस पक्षाकडून तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष निवास शेळके हे या गटातून उमेदवारीसाठी सर्वर्वाधिक चर्चेत आहेत. चडापुरी-माळवाडी गट हा सर्वसाधारण वर्गातील असून, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवास शेळके हे बलाढ्य आणि लोकप्रिय उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. शेळके यांनी आजपर्यंत सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवून
समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात त्यांनी ठामपणे आवाज उठवला असून, जनतेच्या हितासाठी लढा दिला आहे.
समाजहिताचे अनेक उपक्रम त्यांच्या नावावर आहेत. वाढदिवसाच्या निमित्त अनावश्यक खर्च टाळून त्यांनी जिल्हा परिषद शाळे तील अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजांचे पूजन करून आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची परंपरा त्यांनी सुरु केली आहे. तसेच
विविध महापुरुषांच्या जयंती उत्सव अनावश्यक खर्च न करता वैचारिक व्याख्यानांच्या माध्यमातून साजरे करण्याचा उपक्रम त्यांनी राबवला आहे.
रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, शालेय गरजांसाठी मदत, सामाजिक जनजागृती या क्षेत्रांमध्येही त्यांचे मोलाचे योगदान आहे. समाजकारणाच्या बरोबरीने लोकसंपर्क आणि प्रामाणिक कार्यामुळे शेळके यांचा प्रभाव बाढत असून, काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांचा दावा अधिक बळकट झाला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदबारी कोणाला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, मात्र बडापुरी माळवाडी गटातून निवास शेळके हे काँग्रेसचे दमदार चेहरे म्हणून चर्चेत आले आहेत.
