चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
शिवथर : (सातारा) शिवथरचे ग्रामस्थ संतापले! भूमापन अधिकाऱ्यांच्या संगनमतावर थेट आरोप ‘न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू!’ कडक इशारा”
शिवथर ग्रामस्थांचा रोष आज अक्षरशः थेट आकाशाला भिडला आहे. सिटी सर्वे नंबर 1043 संदर्भात नगर भूमापन सातारा कार्यालयाने केलेल्या कारभारावर ग्रामस्थांनी गंभीर आणि थेट आरोप लावले आहेत.
लक्ष्मीदेवीच्या पुरातन मंदिराचा विनापरवानगी पाडाव दत्तात्रेय दिनकर साबळे यांनी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून याबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी, पोलीस स्टेशन, पंचायत समिती आदी सर्व शासकीय कार्यालयांत दाखल आहेत.ग्रामस्थांचा संताप यासाठी की
ज्याचं नाव सिटी सर्वेत नाही, त्याने मोजणीची रक्कम कशी भरली?कार्यालयाने पैसे स्वीकारले की नाही यावरही कोणतेही उत्तर नाही.आणि त्यात भर म्हणजे,
दहा दिवसात दोन नोटिसा… आणि एक नोटीस तर आदल्या दिवशी संध्याकाळी थेट हाती!
यावर ग्रामस्थांचा सवाल सरळ हे अधिकारी कोणाच्या संगनमताने काम करतात?”
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या कागदपत्रांकडे अधिकारी डोळेझाक करत आहेत.
तक्रारदारांना मानसिक, आर्थिक त्रास दिला जातो आहे, पदाचा सरळ दुरुपयोग केला जातो आहे, असा ठपका ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर ठेवला आहे.
ग्रामस्थांचा स्पष्ट इशारा —
“या अधिकाऱ्यांची बदली झाली नाही, कारवाई झाली नाही… तर 22 डिसेंबर 2025 रोजी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करू. आणि त्याला पूर्ण जबाबदार आपणच!”
हा इशारा अर्जाच्या स्वरूपात जिल्हा अधीक्षक नगर भूमापन अधिकारी, पोलीस निरीक्षक सातारा शहर, जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे.
शिवथरमध्ये पुरातन मंदिर पाडल्याच्या प्रकरणासोबतच भूमापन कार्यालयाचा ‘असलेला’ कारभार दोन्ही मिळून आता मुद्दा तापला आहे.गावाचे म्हणणे थेट कायद्याचा अभ्यास न करता, कागदपत्र न पाहता, आम्हाला छळणं बंद करा… नाहीतर शिवथर गाव गप्प बसणार नाही.गावात वातावरण तंग… ग्रामस्थ संतापलेले… आणि कारवाईची मागणी टोकावर पोहोचलेली आहे.
