चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक )

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने सातारा शहरातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्षाचे उपनेते मा. नितीनजी बानगुडे पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे आणि उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ धनावडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान उपनेते नितीनजी बानगुडे पाटील यांनी सातारा शहरातील आगामी नगरपालिका निवडणूक पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने “मशाल” या चिन्हावर लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, शिवसेनेचा मशाल हा संघर्ष, प्रकाश आणि जनतेच्या विश्वासाचा प्रतीक आहे. सातारा शहरात पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने काम करावे.

या प्रसंगी शहर प्रमुख प्रणव सावंत, रवींद्र भनगे, निमिष शहा, बाळासाहेब शिंदे, गणेश आहीवळे, सागर धोत्रे, राहूल जाधव, सुमित नाईक, श्रीकांत पवार, सुनील पवार, राहूल जाधव,आकाश धोंडे, इंगवले, आशुतोष पारंगे, आरिफ शेख, जितेंद्र बडेकर, चंद्रकांत पोळ, बशीर मुजावर, इस्माईलआजाद शेख यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी, प्रभागनिहाय नियोजन, नागरिकांशी संपर्क मोहिमा आणि नवमतदार नोंदणी या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने ठरविले की सातारा महानगरपालिकेत शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या मशालीचा विजय निश्चित करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed