रणजित दुपारगोडे
महाराष्ट्र प्रतिनिधी

शिवसेना (श्री. एकनाथजी शिंदे गट) पुणे शहर अल्पसंख्यांक विभागात नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून, आसिफभाई खान यांची पुणे शहर अल्पसंख्यांक विभागाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ही नियुक्ती पुणे शहराध्यक्ष मा. श्री. रवींद्रभाऊ धंगेकर यांच्या हस्ते, तसेच अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष साकिबभाई आबाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या सोहळ्यात अनेक शिवसैनिक व मान्यवर उपस्थित होते.

याच कार्यक्रमात वसीमभाई शेख यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी आणि शाहनवाजभाई शेख यांची शहर चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षाच्या धोरणांचा प्रसार करून, अल्पसंख्यांक समाजात अधिकाधिक जनसंपर्क वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.

या नियुक्तीनंतर पुणे शहरातील शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण असून, विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अल्पसंख्यांक विभागाच्या नव्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

शुभेच्छुक : साजिद शेख
अध्यक्ष – पुणे शहर
अखिल भारतीय मुस्लिम विकास मंच (सामाजिक संघटना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed