शिवाजी (आप्पा) पवार पुणे जिल्हा प्रतिनिधी




  :-  केंद्रीय रेल्वेमंत्री मा.ना.श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन दौंड विधानसभा मतदारसंघातील विविध रेल्वे विषयक मागण्यांबाबत सविस्तर चर्चा आमदार राहुल कुल यांनी केली.या भेटीस त्यांच्या सोबत त्यांचे मित्र व माजी खासदार श्री. रणजित नाईक-निंबाळकर उपस्थित होते.
यावेळी चर्चेत मंत्री महोदयांनी पुढील महत्त्वाच्या मागण्यांना मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
* दौंड–पुणे दरम्यान लवकरच ‘नमो भारत’ (RRTS) ट्रेन सुरु करण्यास अनुकूलता.
*दौंड–पुणे डेमू फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल.
*दौंड येथील लोको शेड लवकरात लवकर कार्यान्वित करणार
* मुंबई CSMT–सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड स्थानकात थांबा देणार
*दौंडला उपनगरी स्थानक घोषित करण्यासंदर्भात शासन सकारात्मक कार्यवाही करेल.
अशा अनेक विषयासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री महोदयांशी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे आगामी काळात दौंड मतदारसंघातील रेल्वे समस्यांचे समाधान होईल,असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed