ता.जत येथील बेवनूर विकास सेवा सोसायटीत लेखापरीक्षण अहवालात अनेक त्रुटी आढळल्याने सचिवावर कारवाईची करण्याची मागणी सभासदांकडून करण्यात आलेली आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की,बेवनूर विकास सेवा सोसायटीच्या सन १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४ च्या लेखापरीक्षण अहवालात १८ लाखांची मोठी तफावत आढळली आहे.सदर तफावतीची पूर्तता आज अखेर झालेली नाही. संचालक मंडळातील थकबाकीदार सदस्य यांच्याकडून वसुली केलेली नसून आवश्यक नियम ७३(क) व नियम ५८ अन्वये कारवाई न करता पदावर राहू दिले गेले आहे.यामुळे सभासद आणि नागरिकांच्या तक्रारींना वेग आला असून सचिव सुनील कुलकर्णी यांच्यावर तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात येत आहे.लेखापरीक्षण अहवालानुसार,कुलकर्णी यांनी संस्थेच्या सभासदांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडलेली नाही.दोष दुरुस्ती अहवाल सादर न करणारे सचिव दरमहा किमान एक संचालक मंडळ सभा घेण्यासही अनुपस्थित राहिले आहेत. सभासद ‘आय ‘नमुना नोंदवही देखील अद्यावत ठेवलेली नाही तर कर्मचारी प्रशिक्षणासाठी ठराविक आराखड्याचे पालन झालेले नाही.सभासदांकडून शेअर्सची रक्कम २० हजारांच्या मर्यादेच्या वर जाण्यास प्रतिबंध असताना, सचिवांनी अधिक रक्कम हस्तगत केल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद केले आहे.तसेच कर्ज रकमेवर व्याज दर दुपटीपेक्षा अधिक आकारलेले आहे.आवश्यक आर्थिक हिशोब व पुस्तके ठेवण्याचे कामही चुकीच्या पद्धतीने पार पडले असल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद आहे.सलग तीन संचालक मंडळांच्या सभेला गैरहजर राहिल्यामुळे समिती सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली नाही.तसेच संस्थेतील गैरक्षेत्रीय सभासदांचे सभासदत्व कमी न केल्यानेही अनियमितता दिसून येत आहे. सचिव कुलकर्णी यांचे सभासदांच्या कॉलसाठी गंभीर गैरहजेरी असून व्याज भरणाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचा सुद्धा प्रकार नाही.सभासदांना कर्जाच्या पावत्या न देणे, ठराविक लोकांनाच प्राधान्य देऊन काम करणे, आणि कर्ज यादीसाठी पैसा घेण्यास कटपीठी असल्याचे कठोर आरोप आहेत. यामुळे सदर संस्थेची वसुली दहा टक्क्यांपेक्षा कमी राहिल्याने सोसायटीला आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे.सभासदांनी सचिव कुलकर्णी यांच्यावर भ्रष्टाचार करून मोठी माया जमा केल्याचा दावा करत आहेत प्रभावी आणि नियमानुसार कार्यवाही करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.लेखापरीक्षण अहवालातून व सभासदांच्या तक्रारींतून स्पष्ट होते की,सचिव कुलकर्णी यांनी सर्व नियमांचे उल्लंघन करत मनमानी कारभार केला आहे. तसेच, आर्थिक व प्रशासकीय तफावत व भ्रष्टाचारामुळे सोसायटीची प्रतिष्ठा आणि कार्यक्षमता गंभीर संकटात आहे.सभासद व स्थानिक नागरिक तातडीने सचिव कुलकर्णी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांना निलंबित करून तसेच तफावतीची रक्कम वसूल करण्याची मागणी करत आहेत.सभासदांच्या मागण्यांना योग्य न्याय न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची दखल वरिष्ठ कार्यालयाने घ्यावी ही विनंती सुद्धा करण्यात आलेली आहे.
* *तफावतीच्या बाबतीत प्रमुख मुद्दे*
* १८ लाख रुपयांची तफावत लेखापरीक्षण अहवालात आढळली.
* संचालक मंडळातील थकबाकीदार सदस्यांवर नियमानुसार कारवाई न करणे.
* सभासदांना कर्मचाऱ्यांना,वेळोवेळी प्रशिक्षण न देणे