महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 – शोध सत्याचा, त्याला वास्तवाची धार
जालिंदर आल्हाट
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
आज बुधवार, 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सुमारे दहा वाजता नगर–मनमाड रस्त्यालगत राहुरी फॅक्टरी येथील क्रांती हॉटेल शेजारी काही गायांचे लहान लहान बछडे आढळून आले.
दर बुधवार लोणी येथे मोठा साप्ताहिक बाजार भरतो. त्यामुळे अनेक व्यापारी व गुरेढोरे विक्रेते या मार्गावरून ये-जा करतात. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, काही व्यापारी बाजारात विक्री न झालेली किंवा निरुपयोगी समजलेली जनावरे रस्त्याच्या कडेला सोडून देतात. आजही अशाच प्रकारे काही व्यापाऱ्यांनी बछडे टाकून दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हयरल झाला असून
या घटनेमुळे प्राण्यांच्या कल्याणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, या बछड्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.