गणेश कांबळे ( उपसंपादक )


फुरसुंगी : कालच्या अतिवृष्टीमुळे फुरसुंगी-हडपसर परिसरातील रस्ते अक्षरशः चिखलमय झाले आहेत. अनेक मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले असून त्यामध्ये पाणी साचल्याने नागरिकांना वाहन चालविणे ही मोठी कसरत ठरत आहे. पावसाच्या पाण्यात लपलेले हे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. “दरवर्षी पावसाळा आला की हीच परिस्थिती निर्माण होते. काही दिवसांपूर्वीच रस्त्यांची दुरुस्ती झाली होती, पण दोन दिवसांच्या पावसाने सगळा दर्जा उघड केला,” अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, नागरिकांचा रोष वाढत असून, प्रशासनाने त्वरित हालचाल करून खड्डे बुजवण्याचे आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे धोक्याचे आमंत्रण ठरेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
