महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तसेच धाराशिव जिल्ह्याचे संपर्क मंत्री माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या उपस्थितीत परिमल मंगल कार्यालय धाराशिव येथे नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती,निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री भरणे यांनी महायुती म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले कार्यकर्त्यांची स्वबाळाची इच्छा असली तरी वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आपल्याला मान्य करावा लागेल असे सपष्ट पणे सांगितले. या बैठकीस उपस्थित बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच 243 परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी शाश्वत सिंचनाची व वीजेची विकासकामे केली असे हरित क्रांतीचे प्रणेते, लोकनेते मा.आमदार राहुल (भैय्या) मोटे,शिक्षक आमदार विक्रम काळे ,सुरेश दाजी बिराजदार, महेंद्र काका धुरगुडे ,यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार ) गटा चे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी,नेते,आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. या वेळी पत्रकारांनी शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार विचारले असता मंत्री भरणे यांनी पंधरा दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी गव्हावी दिली.