शुभांगी वाघमारे
पै.किरण साकोरे परिवाराच्या हस्ते गंगा आरती;पुणेतील यात्रेकरू भाविकांच्या मोठ्या उपस्थितीने उत्साहाने वाराणसी(काशी) परिसर दुमदुमला
वाराणसी(काशी)/पुणे:विजय लोखंडे,दि.८/११/२०२५.
लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील मायबाप जनतेसाठी प्रदिपदादा कंद युवा मंच व पै.किरण साकोरे मित्र परीवार यांच्या वतीने काढण्यात आलेल्या काशी – विश्वेश्वर व अयोध्या देवदर्शन यात्रेत सुरुवातीला यात्रेकरू भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने पै.किरण साकोरे यांच्या परिवारासोबत परमेश्वर काशी विश्वेशरांचे दर्शन घेतले.यावेळी पुणेतील लोणीकंद – पेरणे गटातील यात्रेकरू भाविकांच्या मोठ्या उपस्थितीने वाराणसी(काशी) येथील गंगा घाट,विश्वेश्वर मंदिर परिसर दुमदुमलेल्या अवस्थेत पहायला मिळाला.यावेळी यात्रेकरूंमध्ये मोठा भक्तीभाव दरवळत वाराणसी काशी विश्वेश्वर या धार्मिक भूमीत पाय ठेवताच व पवित्र गंगेच्या भव्य आरतीने व विश्वेश्वरांच्या दर्शनाने यात्रेकरू भाविक मंत्रमुग्ध झाले.
यावेळी लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटाचे विजयी दावेदार/उमेदवार पै.किरण साकोरे यांच्या परिवाराच्या वतीने विश्र्वेशरांची पूजा पार पडली.तर माता गंगा घाटावर पै.किरण साकोरे व त्यांच्या सहपत्नी यांच्या हस्ते माता गंगेची आरती पार पडली.वाराणसी काशी येथे विश्र्वेशरांचे दर्शन सुव्यवस्थितपणे निवांतपणे प्रत्यक्षात मंदिरात जाऊन लोणीकंद-पेरणे गटातील मायबाप सर्व यात्रेकरूंचे मोठ्या भक्तीभावाने दर्शन झाले.तसेच गंगा घाटावर माता गंगेची आरतीने यात्रेकरूंमध्ये भक्तिभाव आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.
या यात्रेचे आयोजन शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पिडीसीसी बँकेचे संचालक तसेच भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष तथा भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पै.संदिप भोंडवे,यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप,हवेली तालुका.पं.समितीचे मा.उपसभापती ज्ञानेश्वर वाळके,पुणे,हवेली कृ.उ.बाजार समितीचे मा.उपसभापती तथा संचालक रविंद्र कंद,जिल्हा परिषदेचे मा.सदस्य शंकर भुमकर,हवेली पं.स.च्या मा.उपसभापती संजीवनी कापरे व थोर,मोठ्या ज्येष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे पै.किरण साकोरे यांनी माहिती देताना सांगितले.
*[काशी विश्वेश्वरांच्या व यात्रेकरूंच्या आशीर्वादाने लोणीकंद-पेरणे जि.प.गटातील जनतेची सेवा करीत सर्वांगीण विकास करणार – पै.किरण साकोरे…*
काशी विश्वेश्वरांच्या व यात्रेकरूंच्या आशीर्वादाने माझ्या शरीरात व मनात नवी ऊर्जा व चेतना निर्माण झाली असून लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटात समाजकार्यातून जनतेची सेवा करायची तसेच गटाचा सर्वांगीण विकास करायचा ही महत्वाची भूमिका आमची असून त्या दृष्टीने काशी अयोध्या देवदर्शन यात्रेतून आम्ही प्रथम पाऊल टाकले आहे.पुणे येथून वाराणसी काशी येईपर्यंत रेल्वेत यात्रेकरूंना उत्तम प्रवास झाला असून आमच्या स्वयंसेवक,मित्र परिवार,कार्यकर्ते यांनी कोणालाही काहीही कमी पडू दिले नाहीत. यात्रेकरुंची काळजी घेतली असून सर्वांचेच काशी विश्वेश्वरांचे दर्शन व माता गंगा आरती व दर्शन सुव्यवस्थित मोठ्या भक्तिभावाने झाले असून आता आमचा पुढचा प्रवास अयोध्या प्रभू श्रीरामांचे दर्शनाचा आहे.असे माहिती देताना पै.किरण साकोरे यांनी सांगितले.]
*छायाचित्र ओळ:-वाराणसी(काशी) येथे विश्वेश्वरांच्या दर्शन प्रसंगी यात्रेकरू भाविक व गंगा आरती पै.किरण साकोरे यांच्या परिवाराच्या हस्ते पार पडली.याप्रसंगी यात्रेकरूंचा जनसमुदाय.




