नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )

बारामती,   ( पुणे ) दि. ५ नोव्हेंबर २०२५
सावित्री महिला शक्तीकरण फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील तांबे नगर येथे “क्रांती महिला बचत गट” या नव्या बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवे बळ मिळणार आहे.

या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल जगन्नाथ भापकर (सायबाचीवाडी, ता. बारामती) यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष अश्विनी मोरे (बारामती), खजिनदार रूपचंद्र गोलांडे (बारामती), सचिव माधुरी शितोळे (पुणे), सदस्य सुभाष खताळ (संगमनेर), अविनाश दिवेकर (कडेठाण, दौंड) आणि अविनाश गोलांडे (बारामती) यांचा समावेश आहे.

दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत क्रांती महिला बचत गटाच्या अध्यक्षपदी सौ. स्वप्नाली बेलपत्रे यांची तर सचिवपदी नंदा रकटे यांची निवड एकमताने करण्यात आली. या गटात रुपाली ताम्हाणे, उज्वला सादिगले, जयश्री राजगुरू, सुनिता वायदंडे, रंजना पवार, दिपाली मारवाडी, कमल भापकर आणि विजया मोरे या महिलांचा समावेश आहे.

संस्थापक अध्यक्ष राहुल भापकर यांनी स्वतः तांबे नगर येथे जाऊन या नव्या बचत गटातील महिलांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांना बचत गट स्थापन करण्याचे फायदे, शासकीय योजना, तसेच आर्थिक शिस्त व स्वावलंबन याबाबत सविस्तर माहिती दिली.

या प्रसंगी त्यांनी सांगितले की,

> “महिलांचा आत्मविश्वास आणि आर्थिक स्वावलंबन हे समाजाच्या प्रगतीचे मूळ आहे. बचत गट हे महिलांच्या प्रगतीसाठी मजबूत व्यासपीठ आहे,”



असे राहुल भापकर म्हणाले.

या उपक्रमामुळे बारामती परिसरातील महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, फाउंडेशनच्या पुढाकाराने आणखी अनेक बचत गट स्थापन करण्याची योजना असल्याचेही समजते.

महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
“शोध सत्याचा, त्याला वास्तवाची धार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed