गुलाब शेख   ( उपसंपादक  महाराष्ट्र राज्य )

मुखेड – आगामी मुखेड नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी उच्चशिक्षित डॉ. सौ. दिपाली श्रावण रॅपनवाड यांची अधिकृत घोषणा केली. ही घोषणा माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगर यांनी मुखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

माजी आमदार पाटील बेटमोगरेकर यांनी सांगितले की, “मुखेड शहरातील नागरिक हे सेक्युलर ओबीसी विचारसरणीचे आहेत. घोषित उमेदवार हा जनमानसात राहून काम करणारा, सर्वसामान्यांचा आवाज बनलेला कार्यकर्ता आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस–महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांना भक्कम समर्थन मिळेल.”

तसेच त्यांनी डॉ. दिपाली रॅपनवाड यांच्यासह शहरातील सर्व प्रभागातील काँग्रेस, महाआ. आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन जनतेस आणि कार्यकर्त्यांना केले.


पत्रकार परिषदेत प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख शंकर चिंतमवार, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष बबलू भाई मुल्ला, युवक काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले, काँग्रेस मागासवर्गीय सेल शहराध्यक्ष बालाजी साबने, शेकापचे असदभाई बल्की, सय्यद मुजीप यांच्यासह तालुका व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी डॉ. दिपाली श्रावण रॅपनवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


मारोती लिंगूराम पवार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कार्यक्रमात एक महत्त्वपूर्ण घटना घडली. मुखेड बजरंग नगर येथील उच्चशिक्षित व विचारवंत युवक मारोती लिंगूराम पवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी त्यांचे स्वागत करून पक्ष प्रवेश दिला.


कार्यकर्त्यांत उत्साह; निवडणुकीला वेग

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून घोषित झालेल्या डॉ. दिपाली रॅपनवाड यांच्या नावाने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या एकत्रित शक्तीमुळे या निवडणुकीत रंगत वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed