शुभांगी वाघमारे

केसनंद-कोरेगाव मुळ जि.प.गटातील यात्रेकरुंच्या उत्साहाने काशी व अयोध्या परिसर दुमदुमला]-

*वाराणसी-अयोध्या/पुणे:विजय लोखंडे, दि.१८/११/२०२५.*

                   केसनंद – कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील मायबाप जनतेसाठी केसनंद – कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटाचे दावेदार/उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे व केसनंद पंचायत समिती गणाचे दावेदार/उमेदवार संतोष पांडुरंग हरगुडे(एस.पी.) यांच्या वतीने काढण्यात आलेल्या काशी – विश्वेश्वर व अयोध्या देवदर्शन यात्रेत यात्रेकरू भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने सुरेखा रमेश हरगुडे व संतोष पांडुरंग हरगुडे यांच्या परिवारासोबत वाराणसी काशीत परमेश्वर विश्वेश्वर व अयोध्येत प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले.यावेळी पुणेतील केसनंद – कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटातील यात्रेकरू,भाविकांच्या मोठ्या उपस्थितीने काशीचे विश्वेश्वर व प्रभू श्री राम भव्य मंदिर परिसर दुमदुमलेल्या अवस्थेत पहायला मिळाला.यावेळी यात्रेकरूंमध्ये मोठा भक्तीभाव दरवळत वाराणसी काशीत व अयोध्या प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमी या दोन्ही धार्मिक भूमीत पाय ठेवताच व पवित्र काशीचे विश्वेश्वर व आयोध्या भूमीत श्री राम,माता सीता यांच्या दर्शनाने यात्रेकरू भाविक मंत्रमुग्ध झाले.
                        यावेळी केसनंद – कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटाचे दावेदार/उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे व केसनंद पंचायत समिती गणाचे दावेदार/उमेदवार संतोष हरगुडे यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत असे साकडे यावेळी वाराणसी काशीत व अयोध्येत दर्शनावेळी केसनंद – कोरेगाव मुळ जि.प.गटातील यात्रेकरू यांनी काशी विश्वेश्वर व प्रभू श्री रामांकडे घातले.
                          यावेळी सुरेखा रमेश हरगुडे यांच्या परिवाराच्या व सर्व मान्यवरांच्या वतीने काशीत विश्वेश्वरांची पूजा व माता गंगेची आरती व अयोध्येतील प्रभू श्रीराम यांची पूजा पार पडली.वाराणसी काशीत विश्वेश्वरांचे व अयोध्येत प्रभू श्री रामांचे दर्शन सुव्यवस्थितपणे निवांतपणे प्रत्यक्षात मंदिरात जाऊन केसनंद – कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटातील मायबाप सर्व यात्रेकरूंचे मोठ्या भक्तीभावाने दर्शन झाले.यावेळी यात्रेकरूंमध्ये भक्तिभाव आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.

*[काशीचे विश्वेश्वर व अयोध्येचे प्रभू श्री रामांच्या आशीर्वादाने केसनंद – कोरेगाव मुळ जि.प.गटातील सर्वांगीण विकासातून जनतेची सेवा करणार – सुरेखा रमेश हरगुडे*
                   काशीचे विश्वेश्वर व अयोध्येचे प्रभू श्रीरामांच्या तसेच यात्रेकरूंच्या आशीर्वादाने माझ्या शरीरात व मनात नवी ऊर्जा व चेतना निर्माण झाली असून केसनंद – कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटात समाजकार्यातून जनतेची सेवा करायची तसेच गटाचा सर्वांगीण विकास करायचा ही महत्वाची भूमिका आमची असून त्या दृष्टीने काशी-अयोध्या देवदर्शन यात्रेतून आम्ही प्रथम पाऊल टाकले आहे.पुणे येथून वाराणसी काशी येईपर्यंत रेल्वेत यात्रेकरूंना उत्तम प्रवास झाला असून आमच्या स्वयंसेवक,मित्र परिवार,कार्यकर्ते यांनी कोणालाही काहीही कमी पडू दिले नाहीत.यात्रेकरुंची काळजी घेतली असून सर्वांचेच काशी विश्वेश्वरांचे दर्शन व माता गंगा आरती व दर्शन त्यानंतर अयोध्येत जात प्रभू श्री राम मंदिरात दर्शन सुव्यवस्थित मोठ्या भक्तिभावाने झाले असून आता आमचा पुढचा परतीचा प्रवास सुखकर यशस्वी झाला आहे.असे माहिती देताना केसनंद – कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटाच्या दावेदार/उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी सांगितले.]


काशी-अयोध्या यात्रेतून सुरेखा रमेश हरगुडे व संतोष हरगुडे यांना जनतेचा उदंड आशीर्वाद लाभणार – ज्येष्ठ नेते मिलिंद हरगुडे यांचा विश्वास
                            हजारोंच्या वरती आदी भाविकांना काशीचे विश्वनाथ व अयोध्येचे प्रभू श्री श्रीरामांच्या दर्शनासाठी घेऊन जाणे,ही एक अद्वितीय कामगिरी ठरली आहे.सेवाभावी वृत्ती असलेल्या सुरेखा रमेश हरगुडे व संतोष हरगुडे(एस.पी) यांना केसनंद – कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेचा उदंड आशीर्वाद लाभेल आणि त्यांची राजकीय स्वप्ने जनता जनार्दन पूर्ण करेल,असा विश्वास या मोफत देवदर्शन यात्रेच्या प्रस्थान वेळी केसनंदचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते मिलिंद हरगुडे यांनी व्यक्त केला.]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed