शुभांगी वाघमारे
कमी वेळात यात्रेचे दोन टप्पे नियोजनबध्द यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने पै.किरण साकोरे यांच्या यात्रेची गटात जोरदार चर्चा]
*वाराणसी – अयोध्या – पुणे ते दि.१८/११/२०२५.*
लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेसाठी प्रदिपदादा कंद युवा मंच व पै.किरण साकोरे मित्र परिवार आयोजित काशी – अयोध्या देवदर्शन यात्रेचा दुसरा टप्पा मोठ्या उत्साहात व भक्तिभाव वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.आता आतुरता लागली आहे ती या यात्रेच्या तिसऱ्या टप्याची.या तिसऱ्या टप्प्यातील या देवदर्शन यात्रेची रेल्वे येत्या २० नोव्हेंबर रोजी निघणार आहे.खरे तर पै.किरण साकोरे यांनी कमीत वेळात उत्तम नियोजन करून देवदर्शन यात्रेचे दोन टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्याची चर्चा आता लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटात जोरदार रंगत आहे.

काशीचे विश्वेश्वर,अयोध्येचे प्रभू श्रीराम व लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप यात्रेकरूंच्या आशीर्वादामुळे खरे पै.किरण साकोरे विजयी दावेदार असून ते यापुढील कामात यशस्वी होणार असल्याच्या भावना लोणीकंद येथील यात्रेकरू,भाविकांनी व्यक्त केल्या.
वाराणसी काशी येथे लोणीकंदचे माजी आदर्श सरपंच श्रीकांत कंद व सरपंच मोनाली कंद यांच्या हस्ते गंगा आरती सोहळ्याचा प्रमुख क्षण म्हणजे त्यांच्या हस्ते पार पडलेली गंगा आरती.तसेच लोणीकंद मधील आदींच्या हस्तेही माता गंगेची आरती पार पडली.

उत्तम व्यवस्थेची सर्वत्र वाहवा पुणे ते वाराणसी – अयोध्या ते पुणे हा संपूर्ण प्रवास प्रदीपदादा कंद युवा मंच, पै.किरण साकोरे मित्र परिवार,आणि सेवाभावी स्वयंसेवकांनी अत्यंत बारकाईने नियोजित केला.भोजन,निवास,पाणी,आरोग्य सुविधा,वयोवृद्ध प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था सर्व काही व्यवस्थित होते.
अनेक यात्रेकरूंनी कृतज्ञतेने सांगितले, “अतिशय प्रेमळ,जबाबदारीची आणि सुयोग्य अशी व्यवस्था.अशा यात्रेची अनुभूती आम्ही पहिल्यांदाच घेतली.”
यात्रेचे आयोजन व नियोजन पुणे जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष तथा पी.डी.सी.सी.बँकेचे संचालक तर भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद,शिरूर-हवेलीचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष तथा भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पै.संदिप भोंडवे,यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप,हवेली तालुका.पं.समितीचे मा.उपसभापती ज्ञानेश्वर वाळके,पुणे,हवेली कृ.उ.बाजार समितीचे मा.उपसभापती तथा संचालक रविंद्र कंद,जिल्हा परिषदेचे मा.सदस्य शंकर भुमकर,हवेली पं.स.च्या मा.उपसभापती संजीवनी कापरे व थोर,मोठ्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली,तर झेड.पी.गटातील युवक,तरुण यांच्या सहकार्यातून या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील पै.किरण साकोरे मित्र परिवार यांच्या वतीने देण्यात आली.
*[आता उत्सुकता तिसऱ्या टप्याची;आज संवाद मेळावा:-*
प्रदिपदादा कंद युवा मंच व पै.किरण साकोरे मित्र परिवार आयोजित काशी – अयोध्या देवदर्शन यात्रेचे कमी कालावधीत नियोजनबध्द आयोजनातील दोन टप्पे यशस्वी रित्या पूर्ण झाले त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्याची उत्सुकता यात्रेकरूंना लागली आहे.यासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी तिसऱ्या टप्प्याची देवदर्शन यात्रेची रेल्वे निघणार आहे.यासाठी आज पेरणे फाटा जुना टोलनाका जवळ असलेल्या गोल्डन पॅलेस येथे सायंकाळी ६:०० वाजता यात्रेकरूंसाठी भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.]

