चांगदेव काळेल (सातारा जिल्हा संपादक)
सातारा — ( वाई )ऊस वाहतूक करणारे बिनपरवाना ट्रॅक्टर, ट्रेलर, बैलगाडी यांच्याविरुद्ध आवश्यक ती कारवाई न केल्याबद्दल प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सातारा यांच्या निष्क्रीयतेविरोधात अर्जदाराने गंभीर आक्षेप नोंदवला आहे.
अर्जदाराने दिलेल्या निवेदनानुसार, दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी दाखल केलेल्या तक्रारीवर RTO कार्यालयाने 8 जानेवारी 2025 रोजी आदेश जारी केला होता; मात्र त्यानंतर आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 पर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
अर्जदाराने म्हटले आहे की ऊस हंगाम 2025–26 सुरू असूनही बेकायदेशीर वाहतूक सुरूच आहे.
दुसऱ्या जिल्ह्यातून येणारे ट्रॅक्टर बिनपरवानगी व बिनटॅक्स वाहतूक करतात.
ट्रॅक्टरला जोडल्या जाणाऱ्या दोन चाकी गाड्या, बैलगाड्या बिना क्रमांक व बिना पासिंग असल्याने ही वाहतूक पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
रस्त्यावर सामान्य चालकांकडून किरकोळ नियमभंग झाला तरी दंड केला जातो; पण मोठ्या प्रमाणात सुरू असलेली ही बेकायदेशीर वाहतूक दुर्लक्षित केली जाते.
निवेदनात इशारा देण्यात आला आहे की—
जर अशा वाहनांमुळे अपघात होऊन जीवितहानी झाली, तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा RTO अधिकाऱ्यांवर दाखल केला जाईल.
तसेच ऊस गाळप कारखान्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, कारण—
कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ऊस घेण्याची नोंद असते,
नियमांनुसार कर आणि वाहन क्रमांक असलेल्या वाहनातूनच ऊस वाहतूक करणे बंधनकारक आहे.
परिस्थिती न बदलल्यास पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास RTO कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अर्जदाराने दिला आहे.
