संदिप रोमण ( जेजुरी प्रतिनिधी )
जेजुरी ( पुणे ) पुरंदर मधून शिवसेना शिंदे गटातून महिला नगरसेविकेना विशेष महत्व देण्यात आले असून लवथळेश्वर प्रभागातून प्रसिद्ध अडव्होकेट अशोक भोसले यांच्या सुविध पत्नी अमृताताई भोसले यांनी नुकताच शिंदे गटाच्या शिवसेना मधून अर्ज दाखल करीत नगराअध्यक्ष पदाचे उमेदवार विठ्ठल सोनवणे, नगरसेवक उमेदवार गणेश भोसले यांनी शिवाजी चौकातील जेजुरीच्या ऐतिहासिक प्रथम पायरी मार्गाचे दर्शन घेत प्रचारचा प्रारंभ केला आहे.
अमृताताई या उच्चशिक्षित युवती असून कायदातज्ञाचे त्या शिक्षण घेत आहेत लवथळेश्वर विभागातील भेडसवणाऱ्या समस्या स्थानिक सोय सुविधा विशेषतः महिलां मुले यांच्या बाबत सामाजिक कार्य दृष्टीकोनातून जागृती करीत असतात होऊ घातलेल्या निवडणुकी च्या माध्यमातून त्या या समस्या सोडवण्याकरिता प्रयत्नशील असून जेजुरी शहरातून महामार्गांवर होणारे अपघात रोखण्याकरिता तसेच महिला आणि विदयार्थ्यांना सुरक्षित ये जा करण्याकरिता प्रयत्नशील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले, आपल्या शिक्षण आणि समर्थ विचारांचा समाजातील गरजू घटकांना उपयोग करण्याचा त्यांचा मानस असून त्यांनी मतदारांना आपल्या सोबत राहून आपली ध्येय आपला विकास करण्याचे आव्हान दिले आहे जनसामान्यसातून त्यांचे स्वागत होत आहे.

