शुभांगी वाघमारे
एका महिन्यात सर्वांचे एकत्रिकरण मठाची प्रचिती गुरुवर्य विश्वासभाऊ देवकर व गुरुवर्य शंकरमामा भगत यांच्या आशीर्वाद आदेशाने मार्गदर्शनाखाली गाणगापूर येथे आपल्या धनकवडी आंबेगाव पठार भागासाठी केलेला संकल्प श्री दत्तगुरु योग संप्रदाय निर्गुण मठांतर्गत सर्वांच्या तन मन धनाने, सेवा कार्याने, लहानात लहान ते मोठे तसेच जेष्ठ, महिला भगिनी असे कोणी उपस्थित नव्हते असे नाही की या कार्यात मोलाचा सेवेचा वाटा घेतला नाही.*
*याचे भव्य दिव्य स्वरूप काल सर्वाना दिसले श्री दत्त महाराजांचा आशीर्वाद त्यांची प्रचिती आपण सर्वजणांनीच कार्यक्रमा वेळी घेतली.*
*पाऊस आल्याने कित्येक कामे राहिली तसेच कार्यक्रम देखील रद्द किंवा पुढील तारखेला घ्यायचे निश्चित केले परंतु शिष्याने केलेला संकल्प सर्वानी केलेले परिश्रम व दोन्हीही गुरूंनी कार्यक्रमाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून दत्त महाराज यांना केलेले आवाहन याची काल पाहिलेली प्रचिती, आपल्याच होम हवन ठिकाणी पावसाचे सावट आणि सर्वत्र धनकवडीभर पडणारा पाऊस याचे उदाहरण म्हणजेच आपल्या सर्वांना दत्त महाराजांनी दिलेला आशीर्वाद होता.*
*पुण्यनगरीचे शक्ती पीठ श्री सद्गुरू शंकर महाराज यांचा महाप्रसाद तसेच चैतन्य नगर येथील महाराजांचा विश्रांती मठ येथील सोहळ्याला आशीर्वाद पालखी रुपी लाभला.*
*सर्व भक्त गण गुरुवर्य ह.भ. प.माऊली जनार्धन जगले महाराज यांच्या हस्ते धनकवडी जानुबाई हॉल मध्ये श्रीमान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या पादुकांचे पूजन होऊन आपल्या सोहळ्याला सुरुवात झाली.*
*बघता बघता सर्व सोहळा भक्तिमय वातावरणात सर्वानी केलेल्या नियोजनामुळे गुरूंच्या आशीर्वादाने सोहळा भव्य दिव्य, उत्साहात आनंदात भक्तिमय वातावरणात पार पडला.*
एवढा मोठा सोहळा अत्यंत मनोभावे, भक्तीभावाने प्रत्येकाच्या मुखातून दत्त महाराज, स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज यांच्या नाम स्मरणाने केशव शंख नाद पथकाने शंख वादन करून मिरवणूकीचे सारथ्य केले.यामुळे धनकवडी आंबेगाव पठार भाग भक्तिमय वातावरणात दुमदूमला होता.
*हा सोहळा पार पडला, सर्व शक्य झालं ते आपल्या सर्वांच्या मनोभावे सेवाकार्यातून दत्त महाराज यांच्या आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो आपल्या सर्वाकडून दत्त महाराजांची, आपल्या कुटुंबाची, देव,देश व धर्माची अशीच सेवा घडो हिच दत्त प्रभू चरणी प्रार्थना.*
*अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त*
*“अन्नदान महादान” या तत्त्वावर आधारित या यज्ञात अन्नसेवा, पाण्याची व्यवस्था, मंडप, ध्वनी लाउड स्पीकर, लाकूड, लाईट व्यवस्था, प्रसाद वाटप, जनरेटर, टेबल खुर्ची, चटई, जेवणाची भांडी मंगल केंद्र मालक, केशव शंख नाद पथक, जागा उपलब्ध करून देणारे महानगर पालिका क्रीडांगण व्यवस्थापन अधिकारी वर्ग, मनपा आरोग्य स्वच्छता विभाग टीम, पालखी सजावट, स्टेज व हवन कुंड सजावट फुल व रांगोळी, पार्किंग व्यवस्थापन,जय शंकर ट्रॅव्हल्स व आदी सेवा देणाऱ्या सर्व मंडळींना श्रीगुरूंचे अनंत आशीर्वाद लाभो, ही प्रार्थना.*
*यज्ञ कार्यात सहकार्य केलेल्या पतित पावन संघटना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर सर्व धर्म जागरण संघटना, सर्व सामाजिक, धार्मिक संस्था, गणेश मंडळे, श्री. दत्त भक्त मनपा अधिकारी बांधव पोलीस प्रशासन कर्मचारी बांधव, क्रीडांगण सुरक्षा कर्मचारी वृंद, तसेच गुरुबंधू-भगिनी आणि शिष्य परिवार यांचेही मनःपूर्वक आभार.*
*या महान अद्भुत, अविस्मरणीय, अवर्णनीय व अकल्पनीय अश्या दैवी सोहळ्याद्वारे अखंड भारत निर्माण तसेच समाजात सद्भाव श्रद्धा आणि आध्यात्मिक ऐक्याचा संदेश पसरला हेच आपल्या सर्वांच्या सेवेला प्राप्त झालेले फल आहे.*
*अनेक आध्यत्मिक साधक व भक्त यांना विविध देवी देवता यांचे दिव्य अनुभव, उर्जा व कृपा प्राप्ती झाल्याचे अनुभव त्यांनी व्यक्त केले.
