गणेश कांबळे ( उपसंपादक )

फुरसुंगी – ( हडपसर ) देवाची उरुळी नगरपरिषद निवडणूक सन 2025 संदर्भात दिनांक 11 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीत नामनिर्देशन फॉर्म भर प्रक्रिया पार पडली. नगरसेवक पदासाठी एकूण 217 उमेदवारांनी तर नगराध्यक्ष पदासाठी 16 उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जाची नोंद केली आहे.

नामनिर्देशनाचा संपूर्ण कालावधी पूर्णपणे शांततेत आणि सुरळीत पार पडल्याची माहिती फुरसुंगी पोलिसांकडून देण्यात आली. या काळात कोणताही तणाव, वाद, जमाव किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारी घटना नोंद झालेली नाही.

      प्रक्रियेदरम्यान माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी पुणे शहर तसेच माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडल ५ पुणे शहर चे मार्गदर्शन डॉक्टर राजकुमार शिंदे सर तसेच  फुरसुंगी पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले होते. वाहतूक नियंत्रण, जमाव व्यवस्थापन, उमेदवारांच्या रॅल्या आणि समर्थकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली होती.

निवडणूक प्रक्रिया शांततेत पूर्ण करण्यासाठी फुरसुंगी पोलीस स्टेशनकडून अधिकारी, कर्मचारी, बीट मार्शल, क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) यांची विशेष पथके कार्यरत होती. स्थानिक नागरिक, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनीही कायद्याचे पालन करून पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed