इम्रान तांबोळी ( पंढरपूर तालुका प्रतिनिधी )
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत घडत असलेल्या प्रक्रिया आणि निर्णयांमुळे शहरात तर्क–वितर्काची मोठी चर्चा रंगली आहे. आतापर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल मतदानानंतर फक्त तीन दिवसांत जाहीर होत होते. मात्र याच पंढरपूरमध्ये नगरपरिषद नगरसेवक व नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल मतदान झाल्यानंतर तब्बल 18 दिवसांनी — 3 तारखेपासून 21 तारखेपर्यंत घोषित केला जाणार असल्याची अधिकृत माहिती आली आहे.
यामुळे शहरातील नागरिकांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे.
“निकाल जाहीर करायला एवढे दिवस का पाहिजेत? मशीन फिक्सिंग होत आहे का?” असा सरळ प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
कोर्टाचा आदेश वेगळा, पण प्रशासनाची भूमिका वेगळी — मग जनता कुठे जाणार?
निवडणुकीच्या प्रक्रियेवर उठलेल्या आक्षेपामुळे कोर्टात सुनावणी होऊन आदेशही देण्यात आले. कोर्ट जनता आणि न्यायासाठी आहे, मात्र कोर्टाचा स्पष्ट आदेश असतानाही निकाल जाहीर करण्यात विलंब होत असल्याने नागरिकांच्या मनातील संशय अधिकच गडद होत आहे.
शहरात चर्चेचा विषय:
निकाल थांबवून कोणाला फायदा होणार?
कुठल्या दबावाखाली काम काय चाललं आहे?
मतदान जनतेचे, पण निकालांवर सत्ता कोणाची?
सत्यमेव जयते की सत्तेमेव जयते?
भारतीय लोकशाहीतील मूलभूत तत्त्व “सत्यमेव जयते” जनतेच्या मनातून कोसळत चालले आहे.
“भाजप सरकार पैशासाठी कायही करणार का?”
असा थेट प्रश्न शहरातील मतदार विचारताना दिसत आहेत.
निवडणूक लोकशाही पद्धतीने, पारदर्शकपणे आणि वेळेत निकाल जाहीर व्हावा अशी अपेक्षा जनतेची आहे. निवडणूक संपेपर्यंत जनतेला महत्व — निकाल घोषित करताना मात्र शांततेची अपेक्षा… अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
लोकशाही वाचवण्यासाठी जनता एकवटत
पंढरपूरमध्ये सोशल मीडिया, सभांमध्ये आणि रस्त्यावर एकच आवाज:
“लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली, मग निकालही लोकशाही पद्धतीने हवा!”
निकाल विलंबित करण्यामागील कारणे प्रशासन उघड करणार का?
की जनतेचा संशयच सत्य ठरणार?
हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
पंढरपूरच्या जनतेचे एकच मागणे
मतदान केले आमच्याच हाताने, निकालही पाहू आमच्याच डोळ्यांनी!
सत्य उघड होऊ द्या… सत्यमेव जयते जिंकू द्या!
इम्रान तांबोळी पंढरपूर प्रतिनिधी
8788983361
