नेताजी खराडे. (दौंड तालुका प्रतिनिधी)
दौंड ता ०४ डिसेंबर २०२५ दौंड तालुक्यातील मौजे केडगाव स्टेशन पाटबंधारे वसाहत या ठिकाणी गुरुवार दि ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पुणे ब्लड सेंटर व श्रीदत्त सेवा मंडळ केडगाव पाटबंधारे वसाहत बोरीपारधीं यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मा.श्री आनंद दादा काकासाहेब थोरात.(चेअरमन भीमा सहकारी साखर कारखाना पाटस) श्री बाळासाहेब दशरथ सोडनवर (सरपंच ग्रामपंचायत बोरीपाधीं.) सौ पुनम गौरव बारवकर (सरपंच ग्रामपंचायत केडगाव) या मान्यवरांच्या शुभहस्ते भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे असणार आहे सकाळी ७ ते ९:३० वाजे पर्यंत दत्त मूर्ती अभिषेक आरती सोहळा होणार असून श्री दत्त पालखी सोहळा गाव प्रदक्षिणा सकाळी १० ते ११ वाजे दरम्यान केडगाव बाजार पेठेतून पारंपारिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे श्री दत्त सेवा मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तसेच सायंकाळी ०४ ते ६:३० दरम्यान वारकरी संप्रदायातील ह भ प स्वप्निल महाराज दौंडकर यांचे कीर्तन रुपी सेवा तसेच दत्त जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला असून. सायं ०७ ते रात्री ०८ वाजे पर्यंत परमपूज्य श्री नाना महाराज त्रिपदी परिवारतर्फे त्रिपदी भजन आयोजित करण्यात आले आहे
सकाळी १० ते रात्री ०८ पर्यंत सर्व सन्माननीय थोर देणगीदार व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री दत्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



