भानोबा देवाच्या मंगल प्रवासाची वैभवशाली सुरुवात; पहिला मुक्काम भोसलेवाडी येथे उत्साहात – ग्रामस्थ, मान्यवर आणि भाविकांची मोठी उपस्थिती
नेताजी खराडे (दौंड तालुका प्रतिनिधी)

कुसेगाव | भानोबा देवाच्या परतीच्या यात्रेचा पहिला मानाचा मुक्काम आज भोसलेवाडी येथे उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात, पालखीसह श्रद्धाळूंच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली होती.

या पवित्र यात्रेच्या स्वागतासाठी कुसेगावचे सरपंच व मार्केट कमिटी दौंडचे उपसभापती रमेश भोसले तसेच कुसेगावचे माजी सरपंच संतोष भोसले यांनी उपस्थित राहून पालखीचे स्वागत केले.

कार्यक्रमाला सामाजिक, धार्मिक आणि स्थानिक नेतृत्वाची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते शरद भोसले, किरण भोसले, तसेच नवनाथ भोसले, किसन भोसले, प्रणव भोसले, अरुण भोसले, यशवंत भोसले, दिलीप भोसले, राहुल भोसले, हनुमंत भोसले, सोमनाथ भोसले, रंगनाथ भोसले, अतुल भोसले, आकाश भोसले, परशुराम भोसले, सचिन भोसले, जयदीप भोसले, उमेश भोसले, निखिल जगताप, महादेव भोसले, रामहरी भोसले, दत्तात्रय पवार, वसंत भोसले, नितीन भोसले, गणेश भोसले, मिलिंद भोसले, विशाल भोसले, विजय भोसले, अमोल भोसले, विवेक भोसले, गणेश शिंदे, प्रवीण भोसले, ज्ञानेश्वर भोसले, दत्तात्रय भोसले, सुनील अधिकारी, संतोष भोसले, सागर भोसले, दीपक भगत, श्रीकांत भोसले, योगेश रुपनवर, दत्तात्रेय रुपनवर, शरद रुपनवर, मंगेश भोसले, नागासो सोनवणे, राजवर्धन भोसले, दिलीप सणस, संतोष धुमाळ आदींची उपस्थिती विशेष राहिली.

धार्मिक कार्यक्रमात ह. भ. प. विवेक महाराज भोसले यांनी किर्तनाच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक विचारांनी प्रेरित केले. तसेच ह. भ. प. गणेश महाराज निंबाळकर, फलटण यांनीही भव्य व भक्तिमय प्रवचन देत यात्रेचे महत्त्व भक्तांना सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन करताना स्वयंसेवक व ग्रामस्थांनी उत्कृष्ट व्यवस्था केली होती. यात्रेनिमित्त परिसरात भक्तिमय, सांस्कृतिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
शोध सत्याचा — त्याला वास्तवाची धार

Dec 7, 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed