Category: आजची बातमी

राज्यस्तरीय गौरवाच्या पार्श्वभूमीवर गावाचा अभिमान वाढवणाऱ्या बोरी पारधीच्या क्लास वन अधिकारी डॉ. चैताली आव्हाड यांचा ग्रामपंचायतीत शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार

नेताजी खराडे (दौंड तालुका प्रतिनिधी ) बोरी पारधी (ता. दौंड, जि. पुणे) मौजे बोरी पारधी येथील ग्रामपंचायत सभागृहात आज दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड यांची…

पाटसच्या गाव तलावाच्या जागेची तात्काळ मोफत मोजणी करण्याचे तहसीलदारांचे आदेश

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) पाटस (ता. दौंड) – पाटस गावाचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेला नाथबाबांचा तलाव (गाव तलाव) अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याच्या तक्रारींवर अखेर प्रशासनाने कारवाईची दिशा…

1008 कुटुंबाचा महायज्ञ सोहळा धनकवडी आंबेगाव पठार पुणे येथे संपन्न

शुभांगी वाघमारे एका महिन्यात सर्वांचे एकत्रिकरण मठाची प्रचिती गुरुवर्य विश्वासभाऊ देवकर व गुरुवर्य शंकरमामा भगत यांच्या आशीर्वाद आदेशाने मार्गदर्शनाखाली गाणगापूर येथे आपल्या धनकवडी आंबेगाव पठार भागासाठी केलेला संकल्प श्री दत्तगुरु…

पाटस गाव तलावाची खोटी कागदपत्रे तयार करून गाव तलाव विकणार का? नागरिकांचा सवाल

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) पाटस गाव तलावात अतिक्रमण केले त्याच्याच पोटात दुखते का? अतिक्रमण केलेच नाही तर घाबरताय का? पाटस : पाटस गाव तलावावरील अतिक्रमण प्रकरणाला नव्या…

भक्ती, लोकसहभाग आणि आयोजन कौशल्याचा अपूर्व संगम

शुभांगी वाघमारे हडपसर (ता.हवेली ) 13 नोव्हेंबर लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण पै. किरण साकोरे यांनी भक्तीसेवा आणि लोकसहभागाची अप्रतिम सांगड घालत काशी विश्वनाथ व अयोध्येतील प्रभु…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सातारा शहरातील आढावा बैठक संपन्न

चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने सातारा शहरातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्षाचे उपनेते मा. नितीनजी बानगुडे पाटील, जिल्हाप्रमुख…

माझा कार्यकर्ता ऐटीत चारचाकीत फिरला पाहिजे!” — महेंद्रशेठ घरत यांचा भावनिक संकल्प

संजय गायकवाड ( रायगड जिल्हा उपसंपादक ) उलवा (ता. ९ नोव्हेंबर) :“मी कार्यकर्त्याला कुटुंबाचा घटक मानतो. त्याचे सुख-दुःख आपलेच मानतो. त्यामुळेच माझा प्रत्येक कार्यकर्ता ऐटीत, चारचाकीत फिरला पाहिजे, हा माझा…

वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांना सूचना

पंकज सरोदे मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी करण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या…

फुलसावंगी एसटी बसस्टॉपची दुरवस्था – प्रवाशांची गैरसोय, अपघाताचा धोका वाढला!
       श्याम शिंदे
महागाव तालुका प्रतिनिधी

महागाव तालुक्यातील फुलसावंगी हे तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक केंद्र असून, येथील बाजारपेठेत दररोज शेकडो प्रवासी ये-जा करतात. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) फुलसावंगी येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मते, फुलसावंगी येथील एसटी प्रवासी निवारा व बस थांबा अत्यंत जीर्णावस्थेत असून, छप्पर तुटलेले, बसण्याची व्यवस्था नसलेली आणि परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. विशेष म्हणजे, अनेक वेळा बस या विरुद्ध दिशेने थांबत असल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण होत आहे.

प्रवाशांचे म्हणणे आहे की, “एसटी बस नेहमी प्रवासी निवारापासून थोड्या अंतरावर किंवा उलट्या दिशेला थांबतात, त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघाताची शक्यता वाढते. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.”

स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे लवकरात लवकर फुलसावंगी एसटी बस स्टॉपची दुरुस्ती करून प्रवासी निवाऱ्याची सुधारणा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, एसटी बस प्रवासी निवार्‍यासमोरच थांबावी, तसेच बसथांब्याची स्पष्ट निशाणी, बसण्याची सोय आणि सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

जर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात आली नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल आणि प्रशासनावर कारवाईची मागणी केली जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

You missed