Category: मराठी बातम्या

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत गोंधळ शिगेला — निकाल जाहीर करण्यात का होत आहे विलंब? जनता संतप्त

इम्रान तांबोळी ( पंढरपूर तालुका प्रतिनिधी ) पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत घडत असलेल्या प्रक्रिया आणि निर्णयांमुळे शहरात तर्क–वितर्काची मोठी चर्चा रंगली आहे. आतापर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल मतदानानंतर फक्त तीन…

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत गोंधळ शिगेला — निकाल जाहीर करण्यात का होत आहे विलंब? जनता संतप्त

इम्रान तांबोळी ( पंढरपूर तालुका प्रतिनिधी ) पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत घडत असलेल्या प्रक्रिया आणि निर्णयांमुळे शहरात तर्क–वितर्काची मोठी चर्चा रंगली आहे. आतापर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल मतदानानंतर फक्त तीन…

केडगाव पाटबंधारे शाखा अधिकारी ‘गायब’; दाखवा आणि बक्षीस मिळवा!

नेताजी खराडे सहा-सहा महिने कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे शेतकरी हैराण… केडगाव : खडकवासला पाटबंधारे विभागाच्या केडगाव शाखेत गेल्या अनेक महिन्यांपासून शाखाधिकारी आणि इतर अधिकारी कायम गैरहजर असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप…

ऐतिहासिक विजय! ३.३३ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे २२o कोटी मिळणार; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, न्यायासाठी लढलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

हारून शेख ( महाराष्ट्र प्रतिनिधी ) शेतकरी बांधवांनी केलेल्या सातत्यपूर्ण न्यायालयीन लढ्याला अखेर यश मिळाले असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे तब्बल २२० कोटी रुपये अतिरिक्त मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह…

पाटस : बॅनरच्या आडून कोणतं लक्ष्य? नागरिकांचा वाढता प्रश्न — अतिक्रमणाचा वाद चिघळला

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) पाटस येथील साखर कारखाना रस्त्यावर लावलेला एक बॅनर सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. स्थानिक आमदारांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला हा बॅनर दिसायला साधा…

सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर ऊस वाहतूक करणाऱ्या  वाहनांवर कारवाईची मागणी

चांगदेव काळेल (सातारा जिल्हा संपादक) सातारा — ( वाई )ऊस वाहतूक करणारे बिनपरवाना ट्रॅक्टर, ट्रेलर, बैलगाडी यांच्याविरुद्ध आवश्यक ती कारवाई न केल्याबद्दल प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सातारा यांच्या निष्क्रीयतेविरोधात अर्जदाराने…

बंजारा समाजाच्या आमरण उपोषणाकडे मंत्री संजय राठोड यांनी पाठ फिरवली

फिरोज सय्यद सारखणी : नांदेड संतप्त बंजारा समाज बांधवांनी संजय राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन केला निषेध बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सारखणी येथे सुरू असलेल्या…

शेकडो वर्षाची वारकरी परंपरा रेडा गावातील पवार कुटुंबातील तिसरी युवा पिढीने चार दशकापासून जोपासली. – ह. भ. प.रावसाहेब शिपलकर

रेडा गावातील पवार कुटुंबाच्या स्वागताने वारकरी गेले भारावून

कोल्हापुरी फेटे, चहापाणी, फटाक्याची आतिषबाजीने स्वागत

शिवाजी (आप्पा) पवार पुणे जिल्हा प्रतिनिधी

रेडा (ता. इंदापूर, पुणे) श्री क्षेत्र – नागेश्वर मंदिर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा हा अहिल्यादेवीनगर जिल्हा श्रीगोंदा तालुक्यातील कौठा येथून कार्तिक शुद्ध-३  शुक्रवार दि.२४ ऑक्टोंबर २०२५  रोजी पंढरपूरकडे कार्तिकी वारीसाठी प्रस्थान झाला असून (दि.२८) ऑक्टोंबर रोजी रेडा गावात श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे आगमन होताच तोफांची सलामी देऊन फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.पवार कुटुंबाचे प्रमुख माजी ग्रामपंचायत सदस्य सुखदेव पवार  दिंडी सोहळ्याचे प्रमुख व सोहळ्याचे स्वागत केले. महिलांनी तुळशी पूजन करून दिंडी सोहळ्यातील महिलांचे स्वागत केले. श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे हे ४८ वर्ष असून रेडा गावातील पवार कुटुंब हे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर कडे जाणाऱ्या शेकडो वारकऱ्यांचे स्वागत करत असतात.

शेकडो वर्षाची  वारकरी परंपरा पवार कुटुंबातील तिसरी युवा पिढीने गेली चार दशक कार्तिकी एकादशी निमित्त जाणाऱ्या श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे स्वागत व सेवा करण्याची परंपरा जपली असून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना कोल्हापुरी फेटे बांधून, चहापाणी, फटाक्याची आतिषबाजीने स्वागत करत असतात. या स्वागताने अक्षरशः वारकरी मंडळी भारावून जातात. दिंडी सोहळ्यातील महिलांना व मानाचे मानकरी यांना कोल्हापुरी फेटे बांधून स्वागत केल्याने महिला मंडळींच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता.

आषाढी वारी, कार्तिकी व वारीसाठी लाखो वारकरी मंडळी पंढरपूरकडे विठ्ठल दर्शनाची आस घेऊन अक्षरशा ऊन, वारा, पाऊस, संसाराची तमा न करता, देहभान विसरून पंढरपूरकडे जात असतात.

गुरुवर्य निवृत्ती (आण्णा)शिपलकर, वै. गुणाईमाता निवृत्ती शिपलकर यांच्या प्रेरणेने हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे पायी वारी गेली ४८ वर्ष करत आहे. त्यामध्ये ह. भ. प. दत्तात्रय महाराज शिपलकर, सोमनाथ महाराज शिपलकर, रावसाहेब शिपलकर (गुरूजी), भानुदास दातीर महाराज, हरी घोडके, विणेकरी कुमार काका कुलकर्णी, चोपदार हनुमंत नारायण शिपलकर, संजय कुदळे, बाळासाहेब ढोके, वामन रांहीज,भीमसेन खरात, बाळासाहेब लगड, कैलास देशमुख, प्रकाश परकाळे, बाळासाहेब ढोके,मंगल मोटे,सुरेखा जठार, वनिता गिरमकर,सविता पवार, स्पीकर व्यवस्था संजय पवार आदी वारकरी मंडळींनी वारीतील अनुभव कथन केले.

त्याचप्रमाणे ह.भ.प. बबन पवार महाराज (ट्रेलर), बाळासाहेब नागवडे यांनी बहारदार भारुडाचा आणि भजनाचा कार्यक्रम सादर केला. विठ्ठलाच्या चरणी एवढीच आम्ही प्रार्थना करतो की, शेतकरी आणि सर्व सामान्यांना  सुख, समाधान शांती लाभू दे, आणि जन्मोजन्मी आमच्या घराण्याकडून वैष्णव सेवा घडू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करत पवार कुटुंबाकडून भावना व्यक्त केल्या. श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळा हा पवार कुटुंबाच्या पाहुणचार घेतल्यानंतर रेडा गावातील जालिंदर देवकर यांच्या निवासस्थानी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.

श्री क्षेत्र दिंडी सोहळ्याचे  ४८ वे वर्ष-ह.भ.प. रावसाहेब शिपलकर(गुरुजी)

श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर कौठा पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे हे ४८ वर्ष असून ऊन, वारा, पाऊस, संसार याचे देहभान विसरून
पंढरपुरकडे पंढरीच्या दर्शनासाठी हे वारकरी मंडळी निघाले आहेत. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या आस घेऊन वारकरी निघाले आहेत. गेले ४० वर्षे रेडा ग्रामस्थ ज्या पद्धतीने स्वागत करतात अक्षरशः आम्ही सर्व वारकरी मंडळी भारावून जातो.

रेडा गावात आल्यानंतर आम्हाला आमच्या घरी आल्यासारखा अनुभव वाटतो. रेडा गावातील पवार कुटुंब गेली शेकडो वर्षाची वारकरी परंपरा पवार  घराण्यातील तिसरी  युवा पिढीने चार दशकापासून परंपरा जोपासली आहे ही सोपी गोष्ट नाही. अनेक जन्मांच पुण्य असल्यानंतरच अशी सांप्रदायिक आणि वारकऱ्यांची सेवा करणारी पिढी जन्म घेत असते. परमेश्वराच्या भेटीच्या ओढीने हा दिंडी सोहळ्यातील प्रत्येक वारकरी पायी चालत असतो. पंढरपूर मध्ये दिंडी सोहळा पोहोचल्यानंतर चार दिवस  संतराज मठ  पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे. नगर प्रदक्षिणा करून, गोपाळ काला करून पुन्हा दिंडी सोहळा कौठा श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर कडे परतीचा प्रवास सुरू करणार आहे.

रेडा गावातील ग्रामस्थांचे स्वागत इतर कुठेच नाही-ह.भ.प. दत्तात्रय शिपलकर

गेली ४१ वर्ष रेडा गावातील ग्रामस्थ प्रेमाने आणि आनंदाने स्वागत करतात असे स्वागत व सेवा हे दिंडी प्रस्थान ते पंढरपूर पर्यंत इतर कुठेच होत नाही. गेली कित्येक वर्ष रेडा गावातील पवार परिवाराचे प्रमुख सुखदेव पवार आणि त्यांचे पुत्र पत्रकार कैलास पवार हे आमच्या दिंडी सोहळ्याचे अतिशय मोठ्या उत्साहात स्वागत करतात. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत केले जाते. मोठ्या प्रमाणात फेटे बांधून, फटाक्याची आतिषबाजीने आमचे स्वागत केले. आमच्या दिंडी सोहळ्यातील प्रत्येक वारकरी अक्षरशः भारावून जातो.प्रत्येक वारकरी हा रेडा गावातील पवार कुटुंबाच्या स्वागताने सुखावून जातो.

_________

मुंबई–सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा मंजूर — आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

शिवाजी (आप्पा) पवार पुणे जिल्हा प्रतिनिधी :- केंद्रीय रेल्वेमंत्री मा.ना.श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन दौंड विधानसभा मतदारसंघातील विविध रेल्वे विषयक मागण्यांबाबत सविस्तर चर्चा आमदार राहुल कुल यांनी केली.या भेटीस…

लॅबगार्ड कंपनीतील कामगारांची दिवाळी गोड! — कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात तिसऱ्या पगारवाढीचा करार

(उरण – रायगड उपसंपादक संजय गायकवाड) पेण येथील लॅबगार्ड कंपनीतील कामगारांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड ठरली आहे. न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापन आणि संघटनेदरम्यान तिसऱ्या…

You missed