शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी )
इंदापूर : वीरश्री मालोजीराजे यांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी, राजे शहाजी, माॅंसाहेब जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी राजे यांची मूळ जहागिरी, स्वराज्य निर्मितीच्या संकल्पनेचे बीज या भूमीतून निर्माण झाले त्यामुळे या भूमीचे ऐतिहासिक जहागिरीचे महत्त्व लक्षात घेऊन शिवभक्त परिवार इंदापूर आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माॅंसाहेब जिजाऊ यांची जयंती तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती तथा युवक दिन दरवर्षी १२ जानेवारी या दिवशी अतिशय उत्साहाने साजरा करीत असतात.
माॅंसाहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी राजे यांच्याबरोबर स्वराज्य निर्मितीसाठी लढलेल्या मावळ्यांचे वंशज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतात. यावर्षी *श्रीमंत राजे लखोजीराव जाधवराव सिंदखेडराजा यांचे थेट सोळावे वंशज आणि सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांचे थेट बारावे वंशज माननीय श्रीमंत राजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव* हे आहेत तसेच या कार्यक्रमासाठी *इंदौरच्या होळकर घराण्याचे थेट तेरावे वंशज माननीय श्रीमंत राजे भूषणसिंह होळकर* हेही उपस्थित राहणार आहेत.
. माॅंसाहेब जिजाऊंच्या जयंतीचे सगळ्यात मोठे वेगळेपण म्हणजे या दिवशी इंदापूर तालुक्यातील सोनगाव येथील *वीर पत्नी सौ. गौरी अशोक इंगवले अमर शहीद वीर जवान अशोक बापूराव इंगवले* यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तसेच दरवर्षीप्रमाणे इंदापूर तालुक्यातील आजी-माजी सैनिकांच्या तसेच सी. आर. पी. एफ. आणि एस. आर. पी. एफ. जवानांच्या पत्नी आणि माता यांचे जिजाऊ पूजन, साडी चोळी देऊन केले जाणार आहे. संपूर्ण भारतात पहिल्यांदा इंदापूर तालुक्याने सैनिकांच्या पत्नींची आणि मातांची जिजाऊ पूजनाची ही परंपरा सुरू केली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीचे उपक्रम माँसाहेब जिजाऊंच्या तसेच पुण्यश्लोक आहिल्या मातेच्या आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सुरू झालेले आहेत. याच कार्यक्रमात सीमेवर आपल्या जीवनातील तारुण्याचा काळ राष्ट्र सेवेसाठी अर्पण केलेल्या जवानांचाही सत्कार केला जातो.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब माजी सहकार मंत्री हे भूषवणार आहेत. त्यांच्या हस्ते वीर मातांचे आणि वीर पत्नीचे जिजाऊ पूजन होणार आहे.
या कार्यक्रमात सरसेनापती धनाजीराव जाधवराव तसेच माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर *डॉ.लक्ष्मण म.आसबे* व्याख्यान होणार आहे.
इतिहास प्रेमी, स्वराज्य प्रेमी, राष्ट्रप्रेमी असणाऱ्या आपणा सर्वांना हे आग्रहाचे आमंत्रण समजून आपण वीर मातांच्या आणि वीर पत्नींच्या जिजाऊ पूजनाचे भाग्यवान साक्षीदार होण्यासाठी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
स्थळ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मैदान इंदापूर.
दिनांक १२/१/ २०२६.
वार सोमवार
वेळ सकाळी आठ ते दहा.
आपले नम्र,
शिवभक्त परिवार इंदापूर, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर.
