अजित काळेल 

मौजे बेवनूर (ता. जत सांगली )  येथील नैसर्गिक ओढापात्र जाणीवपूर्वक बुजवून काही मोजक्या शेतकऱ्यांनी संपूर्ण जलवाहिनीच बळकावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ओढ्याचा प्रवाह अडवणे, रुंदी नष्ट करणे आणि बंधाऱ्यांमध्ये थेट विहिरी खोदून पाणी उपसा करणे हा कायद्याला धुडकावून लावणारा प्रकार असून, तरीही प्रशासनाची भूमिका संशयास्पद शांततेची आहे.

ओढापात्र गायब झाल्याने अतिवृष्टीत पाणी शेतात घुसून पिके उद्ध्वस्त होत आहेत, भूजल झपाट्याने खालावत आहे आणि गावाला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हे संकट नैसर्गिक नसून, प्रशासनाच्या दुर्लक्षातून जन्मलेले मानवनिर्मित संकट आहे.

अधिक धक्कादायक बाब म्हणजे, काही शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यापेक्षा दोन ते तीन एकर अधिक जमीन ओढापात्रात बळकावल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सार्वजनिक जलसंपत्तीवर असा उघड कब्जा होत असताना महसूल यंत्रणा नुसती प्रेक्षक बनली आहे का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे. ही गंभीर बाब ग्रामपंचायत च्या लक्ष्यात येता तत्काळ सर्वानुमते अतिक्रमण हटवणेबाबत ठराव मंजूर करण्यात आला ,व ठरावाची प्रत जत तहसीलदार याना देण्यात अली आहे ,

तात्काळ संयुक्त मोजणी, अतिक्रमण हटवणे, नियमबाह्य विहिरी सील करणे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर हा प्रकार प्रशासनाच्या अपयशाची कबुलीच मानली जाईल, असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed