नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )

केडगाव : येथे खडकवासला पाटबंधारे विभागाचा बेबी कॅनल गेला असून सध्या कॅनलच्या जागेमध्ये प्लॉट धारकांनी अतिक्रमण केले असून त्यामुळे बेबी कॅनलच्या भरावाला धोका निर्माण झाला आहे हे सर्व उघड उघड होत असताना सुद्धा केडगावचे शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे हे शाखेतच येत नसल्यामुळे त्यांनी‌ या अतिक्रमणांना मूक पाठिंबा दिला आहे की काय अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
   

केडगाव गावातून खडकवासला पाटबंधारे विभागाचा बेबी कॅनल गेला आहे. शासनाच्या नियमानुसार कॅनलच्या जागेमध्ये स्थानिक धन दांडग्या प्लॉट धारकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे बेबी कॅनलच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला असून भविष्यात तो फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर अतिक्रमण केडगाव शाखेच्या ये-जा करण्याच्या वाटेवरच असून सहजच नजरेस पडण्यासारखे आहे.

मात्र येथील शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे हे सहा सहा महिने ऑफिस कडे फिरकतच नसल्याने अतिक्रमण धारकांना मोकळे रान मिळाले आहे. अशातच शाखाधिकारी शेवरे यांना ही बाब माहीतच नाही की ते माहीत असूनही जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत अशी शंका निर्माण होत आहे.
   

शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे यांची नेमणूक केडगाव येथे झालेली असून सुद्धा ते राहायला पुण्यात असल्याने तिथूनच सर्व सूत्रे हलवत आहेत की काय असे वाटत आहे. शाखेत न येण्याचे कारण विचारले असता माझ्याकडे अतिरिक्त तीन ठिकाणचे काम असल्याचे उत्तर देऊन ते टाळाटाळ करतात. तसेच इतर अधिकारीही कामावर हजर नसतात मात्र माझेच नाव का घेता ? तुम्हाला बाकीचे अधिकारी दिसत नाहीत का ?असेही ते माध्यमांच्या प्रतिनिधींना उलट उत्तरे देतात.
   

अशा कामचुकार आणि शासनाचा फुकटचा पगार घेणाऱ्या शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed