नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी)
शासकीय जागेची बेकायदेशीर खरेदी करून अतिक्रमण केलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अमोल तांदळे या गरीब हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याची व हॉटेल उध्वस्त करण्याची धमकी मिळत असल्याने तांदळे यांचे संपूर्ण कुटुंब घाबरलेले असून सध्या प्रचंड मानसिक दडपणाखाली राहत आहेत. यासंदर्भात तांदळे यांनी पोलीस तक्रार केली असून तहसीलदार यांनाही अर्ज दिला आहे. जर न्याय मिळाला नाही तर कुटुंबासह आत्मदहन करण्याची वेळ येण्याची शक्यता अमोल तांदळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.
