नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
यवत :- अवैध पिस्तूलासह तरुण जेरबंद; १५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे ग्रामीण | दौंड तालुका प्रतिनिधी
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा एकूण १५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास, मौजे कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे येथील पिराचे मंदिराजवळ भरतगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
यवत पोलीस स्टेशनकडून गस्त सुरू असताना पोलिसांना संशयास्पद हालचाल आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी कोण?
या प्रकरणी फिरोज कचरू सय्यद (वय ३० वर्षे, रा. कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीस अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
जप्त केलेला मुद्देमाल
एक सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्तूल – किंमत अंदाजे ₹१५,०००
एक जिवंत काडतूस – किंमत ₹१००
असा एकूण ₹१५,१०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १९९/२०२६ भा.ह.का. कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस हवालदार युवराज गावकवाड (ब.नं. १९२९) यांनी केली असून पुढील तपास पोसई / मोरे सर करीत आहेत.
