चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
भुईज (जि. सातारा), 9 डिसेंबर 2025 — पाचवड (ता. वाई) येथे हद्दपारीचा आदेश मोडून परत आलेल्या युवकावर भुईज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास पाचवड गावातील ‘आपुलकी चायनिज’ समोर घडला.
पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ विजय बल्लाळ (वय 34, भुईज पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, अमर विलास माने (वय 19, रा. विराटनगर, पाचवड) या युवकास सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. हा आदेश मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांनी आदेश क्रमांक स्थागुशा/09/25, म.पो.कॉ. क 55/2173/25 दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी जारी केला होता. त्यानुसार 1 ऑक्टोबर 2025 पासून त्याला संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रवेश बंदी होती.
तथापि, संबंधित युवक पोलीस अधीक्षकांची परवानगी न घेता पाचवड येथे परत आल्याचे आढळून आले. यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास ए. जी. सपकाळ (पो.हवा. ब. क्र. 67) हे करत आहेत.
भुईज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पी. वाय. ताटे, सपोनि यांनी घटनेची नोंद 16.36 वाजता केली असल्याचे कळते.
