इम्रान तांबोळी ( पंढरपूर तालुका प्रतिनिधी )

केवायसीच्या नावाखाली बँक खातं रिकामं करणाऱ्या सायबर भामट्यांचा नवा सापळा!
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सायबर फसवणुकीचे प्रकार प्रचंड वाढले असून नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या कोणत्याही बँकेच्या नावाने ‘KYC अपडेट करा’ असा मेसेज, लिंक किंवा अ‍ॅप डाउनलोड करण्याचा संदेश येत असल्यास तो अजिबात उघडू नये किंवा डाउनलोड करू नये.
लिंकवर क्लिक किंवा अ‍ॅप डाउनलोड केल्यास काय होऊ शकते?
तुमच्या मोबाईलचा संपूर्ण अ‍ॅक्सेस हॅकर्सकडे जातो
बँक खात्यातील सर्व रक्कम काही मिनिटांत उडवली जाते
खातं थेट झिरो बॅलन्स होण्याचा धोका
“नवीन वर्षाचे गिफ्ट लागले आहे”, “लकी ड्रॉ जिंकलात” अशा आमिषाचे मेसेजही सध्या मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. असे मेसेज आले तर ते उघडू नका, कोणतीही लिंक क्लिक करू नका.
व्हॉट्सॲप, फेसबुक, टेलिग्रामसह सोशल मीडियावरून येणारे अनोळखी मेसेज, व्हिडिओ, APK फाइल्स हे सर्व फसवणुकीचेच प्रकार आहेत.
अशा सर्व मेसेजकडे दुर्लक्ष करणेच सुरक्षित आहे.
महत्त्वाची सूचना:
कोणतीही बँक कधीही SMS/व्हॉट्सॲपवरून लिंक पाठवून KYC अपडेट करण्यास सांगत नाही
बँकेचे अधिकृत काम फक्त शाखेत किंवा अधिकृत अ‍ॅप/वेबसाइटवरच होते
नागरिकांना आवाहन:
स्वतः सावध राहा
कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, मित्रमंडळींना ही माहिती नक्की शेअर करा
फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाईन किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा

थोडीशी काळजी = मोठा तोटा टळू शकतो
सायबर भामट्यांपासून स्वतःला आणि समाजाला वाचवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed