नेताजी खराडे

बारामती (प्रतिनिधी) :
सावित्री महिला शक्ती करण फाउंडेशन
(रजिस्टर नं. महा/1164/2025/पुणे)
लोणीभापकर, सायबाचीवाडी, ता. बारामती, जि. पुणे यांच्या अधिकृत क्रांती महिला बचत गटाची स्थापना तांबे नगर, बारामती येथे करण्यात आली.
नवीन वर्षाचे स्वागत तसेच ३ जानेवारी २०२६ रोजी येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून, आज दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. तसेच नव्याने स्थापन झालेल्या क्रांती महिला बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतून महिलांमधील कला, आत्मविश्वास व संस्कृतीचे दर्शन घडले.
वेशभूषा स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले —
🔹 प्रथम क्रमांक : सौ. चित्रा देवकर
🔹 द्वितीय क्रमांक : सौ. प्रितांजली एखंडे
🔹 तृतीय क्रमांक : सौ. सुनिता पिसे
🔹 उत्तेजनार्थ पुरस्कार :
सौ. भाग्यश्री लिगाडे
सौ. पूनम देवकर
विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वेशभूषा स्पर्धेचे निकाल विशाखा ढवाण पाटील, सुचित्रा कडाळे व राहुल भापकर यांनी जाहीर केले.
हा संपूर्ण कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष राहुल जगन्नाथ भापकर (सायबाचीवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच क्रांती महिला बचत गट बारामती यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन क्रांती महिला बचत गटाच्या अध्यक्ष स्वप्नाली बेलपत्रे, सचिव नंदा रकटे व सर्व सदस्यांनी उत्कृष्टरीत्या केले.
कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लाभली —
▪️ संस्थापक अध्यक्ष राहुल भापकर
▪️ क्रांती महिला बचत गट अध्यक्ष स्वप्नाली बेलपत्रे
▪️ सचिव नंदा रकटे, रुपाली ताम्हाणे
▪️ महिला आघाडी अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) सौ. सुचित्रा कडाळे
▪️ सौ. विशाखा काकडे ढवाण पाटील (ग्रुप सदस्य)
▪️ नवनिर्वाचित नगरसेविका सौ. धनश्री अविनाश बांदल
▪️ तसेच क्रांती महिला बचत गटाच्या सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संचिता संतोष देवकर यांनी प्रभावीपणे केले.
महिला सक्षमीकरण, संघटन व सामाजिक जाणीव वाढविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला असून, सावित्री महिला शक्ती करण फाउंडेशनचे हे उपक्रम निश्चितच समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *