फुरसुंगीतील 26 सप्टेंबर पासून गायब असलेली 19 वर्षीय पूजा जाधव अखेर जम्मू-काश्मीरमध्ये सापडली पोलीस तपासात रजिस्टर मॅरेज चा खुलासा पोलिसांच्या जलद कारवाईला यश
फुरसुंगी (हडपसर): फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या मनुष्य -मिसिंग प्रकरणातील 19 वर्षीय पूजा संतोष जाधव हिचा अखेर ठावठिकाणा लागला आहे. मिसिंग रजिस्टर क्रमांक 115/25 अंतर्गत 26 सप्टेंबर 2025 रोजी पूजाच्या बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली होती. प्रकरण गंभीर मानून फुरसुंगी पोलिसांनी तपासाला वेग देत तांत्रिक पुराव्यावर आधारित शोध मोहीम सुरू केली.
प्राथमिक तपासामध्ये पूजा एका संशयित तरुणा सोबत गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याच्या मोबाईलचा सीडी आर तपासल्यानंतर लोकेशन थेट कथु आ, जम्मू-काश्मीर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार एक विशेष पथक तत्काळ रवाना करण्यात आले. या पथकात मुलीचे आई-वडील उमा आणि संतोष जाधव यांच्यासह स. पो. फौ. फडतरे, पो. ह. 6928 पोटे आणि पो. अं. 23 कोरडे यांचा समावेश होता. पथकाने कथु आमध्ये पोहोचताच स्थानिक पोलिसांची मदत घेतली आणि सीडी आरमधील टॉवर लोकेशन च्या आधारावर सखोल शोध मोहीम राबवली.
या संयुक्त कारवाईदरम्यान पूजा जाधव सुरक्षित अवस्थेत आढळून आली. चौकशीदरम्यान तिने पालकांसोबत परत येण्यास नकार देत जम्मूमधील मित्र विजयसिंह राजपूत याच्यासोबत तिने रजिस्टर विवाह केल्याची माहिती दिली. तिने सादर केलेले विवाह प्रमाणपत्र पाहून पथकाने तिचा निर्णय स्वतःच्या इच्छेने घेतल्याची नोंद केली.
संपूर्ण प्रकरणाची अधिकृत नोंद कथु आ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील कार्यवाही संदर्भातील माहिती फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अमोल मोरे साहेब यांनी दिली. पूजा सुरक्षित सापडल्यामुळे कुटुंबीयांनी तसेच पोलिसांनी दिलासा व्यक्त केला आहे.