सचिन पांडलवाड  ( कंधार ता. प्रतिनिधी )

जंगमवाडी : गावातील नाल्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, नाल्यातील सांडपाणी व घाण रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नाल्याची स्वच्छता व दुरुस्ती करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याऐवजी १५ वा वित्त आयोगाच्या निधीचा योग्य वापर करण्याऐवजी निधीच्या वापराबाबतच अधिक लक्ष दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रत्यक्षात नाल्याची समस्या कायम असताना ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना का केली जात नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.



नाल्याची तातडीने साफसफाई करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा पारदर्शक व नियमानुसार वापर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

छायाचित्र : जंगम वाडीतील दुरावस्थेत असलेला नाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *