Category: अपडेट न्यूज

भारताचे माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी पुण्यतिथी व भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेसतर्फे अभिवादन कार्यक्रम

मोहसीन आतार ( प्रतिनिधी ) सोलापूर, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि भारताचे माजी गृहमंत्री लोहपुरुष सरदार…

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या तरुण नेतृत्वाकडे प्रभाग ३ चा वाढता विश्वास

शिवाजी (आप्पा) पवार पुणे जिल्हा प्रतिनिधी इंदापूर शहरातील तरुण, संयमी आणि शांत स्वभावाचा चेहरा म्हणून सौरभ लक्ष्मण शिंदे यांचे नाव आज सर्वांच्या ओठांवर आहे. शिक्षण, संस्कार आणि समाजकारण यांचा सुंदर…

*”जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा” हाच माझ्या आयुष्याचा मार्गदर्शक मंत्र* : – *प्रसिद्ध आर्किटेक्ट व जनसेवक श्री.वसंतराव मालुंजकर यांचे प्रतिपादन.*

(*नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्यास इंदापूर शहराचा कायापालट करणार.* – *श्री. वसंतराव मालुंजकरांची स्पष्टोक्ती*)

(*पत्रकारांशी मनसोक्त संवादात दिली माहिती.)*

*शिवाजी (आप्पा) पवार पुणे जिल्हा प्रतिनिधी*

   हजरजबाबीपणा हा बुद्धी चातुर्याचा गुण आर्किटेक्ट श्री. वसंतराव मालुंजकरांकडे असल्याने तल्लक विलक्षण बुद्धीमत्तेच्या जोरावर समोरच्या व्यक्तीच्या मनात आपलं स्थान निर्माण करणं हे त्यांचं खास कौशल्य. कोणत्याही प्रसंगात मिश्किल, विनोदी शैली त्यांच्या वाणीत पहावयास मिळते. नेतृत्व, साहस, बुद्धीमत्ता, चातुर्य आणि निर्णय क्षमता हे इंजिनिअर व जनसेवक श्री. मालुंजकर साहेबांच्या बुद्धीचातुर्यातून सहज दिसून येते.
महाविद्यालयीन जीवनातच श्री. मालुंजकर यांना सामाजिक कार्याची गोडी लागली. आपल्या बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची आगळीवेगळी ओळखं निर्माण करणारं अष्टपैलू,संवेदनशील, प्रामाणिक आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच प्रसिद्ध आर्किटेक्ट व जनसेवक श्री. वसंतराव मालुंजकर साहेब होय.
इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे
इंदापूरचे सुपुत्र, माजी खासदार श्रद्धेय कै. शंकरराव पाटील (भाऊ), माजी आमदार कै. गणपतराव (बापू) पाटील, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रदीपदादा गारटकर या समाजसेवकांचा श्री. वसंतराव मालुंजकरांना बहुमोल सहवास लाभला. तसेच या नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन देखील लाभले. म्हणूनच त्यांना इंदापूर शहराच्या सामाजिक,राजकीय, विकासात्मक क्षेत्रात गेली दोन दशकांहून अधिक काळ निष्ठेने अविरत काम करण्याची संधी मार्गदर्शक श्री.प्रदीपदादा गारटकर, कृषिमंत्री ना.दत्तामामा भरणे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेब व शहरातील मायबाप जनतेमुळे मिळाली.
श्री.मालुंजकर सन २०१० साली पक्षाच्या तिकिटावर इंदापूर नगरपालिकेत नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले. निवडणुकीत २२ मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. जनतेचा कौल मान्य करत. पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागले.शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत  शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला.
२०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते श्री. प्रदीपदादा गारटकरांनी विश्वास ठेवत जनसेवक श्री. मालुंजकर यांच्या पत्नी सौ. हेमलता मालजुंकर यांना पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची संधी दिली. या निवडणुकीत प्रभागातील मतदारांनी विजयाचा कौल सौ. हेमलता वसंतराव मालुंजकर यांना दिला. त्यानंतर  आपल्या प्रभागात विकासाची घोडदौड सुरू झाली. साडेचार कोटी रुपयांची विकासकामे प्रभागात केली.
आय कॉलेज ते दर्गा मस्जिद चौक आणि दर्गा मस्जिद रोड ते टेंभुर्णी नाका हे दोन महत्त्वाचे रस्ते तयार करण्यात आले. (४० फुटी रोड.)
प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण,ड्रेनेज, नवीन विद्युतीकरणासाठी पोल, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, आदी कामे नगरसेवक पदाच्या कार्यकाळात मजबुतीने केली.व्हि.डी.कन्सल्टंट मार्फत घरकुल योजना धारकांना बांधकामासाठी प्लॅन व इस्टिमेट आर्किटेक्ट श्री.मालुंजकर यांनी विनामूल्य तयार करून दिले.
श्री.वसंतराव मालुंजकरांचे व्हि.डी कन्सल्टंट हे  पुणे, सोलापूर ,नाशिक, अहिल्यानगर,व सातारा जिल्ह्यामध्ये विश्वसनीय व प्रगत असं फर्म आहे. फर्मच्या माध्यमातून अनेक आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअर तरुण – तरुणींना रोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरिता मोलाचं योगदान मिळालं.
शहरातील गणेश मंडळांना, दहीहंडी ग्रुप, विविध सामाजिक उपक्रमांना, आरोग्य शिबिरांना तसेच कोरोना काळात देखील गोरगरिबांना सर्वतोपरी मदत सामाजिक बांधिलकी जपत जनसेवक श्री. वसंतराव मालुंजकर यांनी केली.
यंदाच्या होऊ घातलेल्या इंदापूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत थेट नगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत श्री.वसंतराव मालुंजकरांच नाव आघाडीवर चर्चिले जात असल्याची चर्चा इंदापूर शहरात रंगत आहे.
१) स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट शहर उभारणे.२) बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे.३) शिक्षण,आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याच्या सोयी सुधारणे ४) प्रशासन जनतेच्या दारात नेणे. हाच ध्यास जनतेची सेवा करताना राहील.प्रत्येक घरात दिवा कायम उजळत राहावा. प्रत्येक रस्ता स्वच्छ व सुरक्षित असावा आणि प्रत्येक नागरिकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचावा हेच माझे ध्येय राहील.
जनतेचा विश्वास  – माझी शक्ती
शहराचा विकास – माझा संकल्प.
चला, आपण सगळे मिळून एक प्रगत स्वच्छ आणि सशक्त शहर उभा करूया कारण – 
” जनसेवा हीच ईश्वर सेवा!”

“जनसेवा हीच ईश्वर सेवा” – हा केवळ एक विचार नाही, तर माझ्या आयुष्याचा मार्गदर्शक मंत्र आहे, समाजाच्या सेवेतून, लोकांच्या समस्यांचे निराकरण करताना मिळणारा समाधानाचा अनुभव हाच खरा ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे ,असा माझा ठाम विश्वास आहे.अशा शब्दांत पत्रकारांशी संवाद साधताना इंदापूरचे प्रसिद्ध आर्किटेक्ट व जनसेवक श्री.वसंतराव मालुंजकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ज्ञान मिळविण्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे — डॉ. शहाजी चंदनशिवे (प्रतिनिधी – हारून शेख)

परंडा, जि. धाराशिव —“वाचनाशिवाय ज्ञानप्राप्ती अशक्य आहे. जगातील कोणतीही माहिती, विचार किंवा संशोधन समजून घेण्यासाठी वाचन हीच खरी गुरुकिल्ली आहे. देशातील महान नेत्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी, समाजातील अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा…

You missed