नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )

दि. २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन दौंड तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, दौंड तहसील कार्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत – दौंड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार श्री. अरुण शेलार हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. ममता देशमुख, पुरवठा निरीक्षक श्री. गडमवार आणि पुरवठा अधिकारी श्री. पंकज गोरे यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत – दौंड तालुका अध्यक्ष श्री. प्रमोद शितोळे यांनी उपस्थितांना मनोगतातून ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये, दैनंदिन जीवनात होणाऱ्या फसवणुका कशा टाळाव्यात, अन्नभेसळ कशी ओळखावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांबाबत माहिती देत विद्युत वीज वितरण कायदा 2003 अंतर्गत शेतकऱ्यांचे हक्क स्पष्ट केले. बियाणे व खतांमधील फसवणूक टाळण्याचे उपाय, तसेच वस्तू खरेदी करताना पावती घेणे कायद्याने बंधनकारक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी अॅड. अक्षयजी कुमार यांनी भारत सरकारच्या नोटरी संदर्भातील कायदे, विविध ग्राहक संरक्षण कायदे व ग्राहकांच्या हितासाठी असलेल्या तरतुदी याबाबत सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक प्रतिज्ञा साजरी करण्यात आली. ही प्रतिज्ञा सौ. राणीताई राऊत यांनी घेतली. तसेच आशाताई धायगुडे यांनी “ग्राहक जागो… जागो सुंदर” ही जनजागृतीपर कविता सादर करून कार्यक्रमात रंग भरला.
याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब धुमाळ (मुंबई) यांनी पोलीस खात्यातील अनुभव कथन करत ग्राहक संरक्षण व पोलीस कायद्यांबाबत कार्यकर्त्यांना सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. गडमवार यांनी अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे, उपाध्यक्ष राजेंद्र शेलार, नामदेवराव जठर पाटील, अक्षय कुमार शितोळे, नामदेवराव होले पाटील (अध्यक्ष – लोककल्याण आधार मंच), सौ. शोभा अहिरेकर, दादासाहेब जाधव, संपतराव खताळ (सचिव), सिताराम शेळके, राहुल सातपुते (पुणे जिल्हा सदस्य), सौ. राणीताई राऊत, आशाताई धायगुडे (प्रसिद्धी प्रमुख), गोरक्ष शितोळे, आप्पासाहेब वाघमारे (ज्येष्ठ समाजसेवक), पद्माबाई पासलकर, भगवानराव मोरे (माजी सैनिक), सतीश शितोळे (माजी सैनिक), मा. पोलीस निरीक्षक सुरेश लोंढे, अशोक अग्रवाल, भाऊसाहेब दरेकर, नानासाहेब साखरे, बेगमताई (उपाध्यक्ष) यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शरद गुणवरे पाटील यांनी केले.
कार्यक्रमास पुरवठा अधिकारी श्री. पंकज गोरे यांनी अनुमोदन दिले.
कार्यकर्त्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन श्री. दिनेश फराटे (लिपिक – पुरवठा विभाग) यांनी गुलाब पुष्पगुच्छ देऊन केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे ग्राहकांमध्ये जागृती, कायदेविषयक माहिती आणि हक्कांविषयी सजगता निर्माण झाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed